You are currently viewing कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन गाड्यांमध्ये अपघात, पाच जण जखमी

कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन गाड्यांमध्ये अपघात, पाच जण जखमी

कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन गाड्यांमध्ये अपघात, पाच जण जखमी

मालवण

कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात ४ वाजण्याच्या दरम्यान घडला.
कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे नियंत्रण सुटल्याने दोन चारचाकी गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. अपघात घडल्याचे कळताच कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी सभापती मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे, ग्रामस्थ सुनील वस्त व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, धोंडू जानकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. जखमींना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मालवण येथे 108 रुग्णवाहिकेने हलवण्यात आले पोलीस निरीक्षक सुतार ,हेडकॉन्स्टेबल श्री जानकर साहेब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा