You are currently viewing 13 डिसेंबर रोजी डांमरे ग्रामदेवता श्री देव गांगो अनभवानी माताचा वार्षिक जत्रोत्सव

13 डिसेंबर रोजी डांमरे ग्रामदेवता श्री देव गांगो अनभवानी माताचा वार्षिक जत्रोत्सव

कणकवली :

 

पाच शेर पाणी जाळणारी आणि भक्तांच्या हाकेला व नवसाला धावून जाणारी डांमरे गावची ग्रामदेवता श्री देव गांगो अनभवानी माता हिचा वार्षिक जत्रोत्सव 13 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. या यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे. पाण्यावर दिवा या यात्रे दिवशी पेटवला जातो. पाचशेर पाणी कोव्हाळ्यात मानकरी ओततात तर नंतर ते पाणी दीप स्तंभावर ठेवलं जातं. देवाची स्वारी निघते. पाच फेऱ्या नंतर, दशावतारी नाट्य प्रयोग होतो. दुसऱ्या दिवशी अनभवानी उगम स्थानाकडे देवीचे सर्व तरंग घेऊन बारा पाचाचे मानकरी गाव व रयतेला घेऊन कानडे वाडी येथील ब्राह्मण देवस्थान कडे जातात. संपूर्ण गाव फेरी पूर्ण झाल्यावर देवाचे तरंग अनभवानी मातेच्या मंदिरात आणले जातात अशी माहिती ग्रामस्थ बबलू सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा