नवी मुंबई / सुचित्रा कुंचमवार (प्रतिनिधी) :
दि. 7/12/23 रोजी नागरी संरक्षण दल जिल्हा ठाणे महाराष्ट्र शासन श्री विजय जाधव उपनियंत्रक यांच्या आदेशानुसार (बेलापूर विभाग) अंतर्गत येणारे नेरूळ स्टेशन येथे नागरी संरक्षण दलाच्या 60 वा. वर्धापन दिनानिमित्त प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आपतकालीन परिस्थितीत सकंटात अडकलेल्या नागरिकांना कशा प्रकारे मदतकार्य करायचे हे करताना कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नागरी संरक्षण दलाच्या वतीने प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. नेरूळ स्टेशन येथे ही प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये अचानक लागलेल्या आगीत अडकलेल्या नागरिकांना कशी मदत करायची ते करताना स्वताची काळजी कशी घ्यायची जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुरक्षित मदतकार्य कसे पोहचविण्यात येईल. तसेच अग्निशमन दलाची मदत कशी घ्यायची आणि त्यानंतर ही मदत सुजाण नागरिकांप्रमाणे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम कसे कराल. प्रथोपचार कसे कराल स्वयमंसेवकांन कडून ती प्रात्यक्षिके करून दाखवली आपत्कालीन परिस्थितीचा सामाना कसा करायचा या विषयीची माहिती देण्यात आली. नागरी स्वयमंसेवकांना अग्निशमन प्रथमोपचार विमोचन इत्यादी बाबतचे प्राथमिक तसेच प्रगत प्रशिक्षण देण्यात येते नागरी संरक्षण संघटनेचे प्रशिक्षण देऊन स्वयंमसेवक म्हणून करण्यात येते कोणत्याही आपत्तीच्या जसे पुर, भूकंप, दहशतवादी हल्ला, आग, स्पोट इत्यादी वेळी नागरी संरक्षण संघटनेचे प्रशिक्षित कर्मचारी व स्वयंमसेवक महत्त्वाच्या इतर शासकीय संस्था पोहचवण्यापुरवी दुर्घटना स्थळी लोकांना मदत व बचावाचे कार्य करते दुर्घटनेनंतर पहिले काही क्षण सुटका व बचाव कार्याच्या दूरदृष्टीने महत्वाचे असतात.
हे प्रात्यक्षिके सादर करताना सामाजिक कार्यकर्त्या सौ सुवर्णा हाडोळे (विभागीय क्षेत्ररक्षक) व करमविर सिंग भुर्जी व सर्व स्वयंमसेवक यांनी हे आयोजित केले.