आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये परप्रांतीयांवर गुन्हे दाखल करण्याचीं मागणी
सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार व त्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना याबाबतचे निवेदन केले सादर
सावंतवाडी
दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे उभारत असलेल्या द ओरिजिन कंपनी गुडगाव येथील प्रकल्पात कामास असलेल्या परप्रांतीयांवर आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये गुन्हे दाखल करण्याचीं मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार वं त्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे केली याबाबतचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल त्यात महसूल ने ही लक्ष घालावे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
दोन दिवसापूर्वी सासोली येथे द ओरिजिन कंपनी रा.गुडगाव या हरयाणा राज्यामधून काही परप्रांतीय कामगार सासोली येथे कपंनीत आले होते.सदरील कामगार सासोली येथील स्थानिकांच्या सामायिक जमिनीत घुसून बेकायदा शिरकाव केला. असे निदर्शनास आले.द ओरिजिन या कंपनीचे कामगार हे परराज्यातून आले आहेत असे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे त्यामुळे त्यांच्यावर आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये गुन्हे दाखल केले जावेत. या परप्रांतीय कंपनीने आपल्या कंपनीची तसेच कामगारांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करणे क्रमप्राप्त होते परंतु त्यांनी नोंद केली नसल्यामुळे कंपनीचे मालक, संचालक मंडळ गंभीर गुन्ह्यास पात्र आहेत. हे परप्रांतीय कामगार किती दिवसापासून दोडामार्ग तालुक्यात वास्तव्यास आहेत? कोणत्या कारणासाठी ते येथे आले आहेत?किती दिवस ते राहणार आहेत ? आधारकार्ड तपासणी झाली आहे का ? त्याची नोंद दोडामार्ग पोलिस ठाण्यात झाली आहे का असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत त्यामुळे जर त्यांच्या नोंदी नसतील तर या कंपनीवर,परप्रांतीय कामगारांवर आंतरराज्य स्थलांतरित कायद्यान्वये गुन्हे पोलिसांनी दाखल करावेत.
याप्रश्नई आम्ही सामाजिक कार्यकर्ते स्थानिक लोक ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम आहोत.दुसर्या राज्यातून येवून दादागिरी करत असतील तर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत ही आमची मागणी आहे. गेली अनेक वर्षे आंतरराज्य स्थलांतरित कायदा(1979) अन्वये परप्रांतीयांची नोंद ठेवावी अशी मागणी करतं असून तसा पत्रव्यवहार केला आहे.त्याप्रमाणे आपणही मध्यंतरी काळात अनेक पोलिस ठाण्यात नोंद ठेवण्यासंदर्भात सूचनाही केल्या होत्यां. परंतु सातत्या अभावी आजही अश्याप्रकारची नोंद होताना दिसत नाहीत.म्हणून स्थानिक लोकांच्या हक्कासाठी मागणी प्रमाणे कार्यवाही न झाल्यास आम्ही सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थांना सोबत घेवून आंदोलन करणार तर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा सुभेदार यांनी दिला. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनी यां प्रकरणाची सखोल चौकशी करून तसे आढळून आल्यास संबंधित यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. यातील बराचसा विषय महसूल दफ्तरी येत असल्याने त्यांनी ही लक्ष देणे आवश्यक आहे पोलिस याबाबत योग्य तपास करतील असे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने महसूल विभागाला देखील निवेदन सादर करून चौकशी चीं मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी
स्वाभिमानी कामगार संघटनेचे तालुका समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार प्रकाश साटेलकर दोडामार्ग तालुका समन्वयक निलेश देसाई प्रवीण गवस आबा चिपकर संदेश सावंत सुनील नाईक तेजस चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*