You are currently viewing ओरोस पोलीस परेड मैदान येथे “अवकाश दर्शन” कार्यशाळा संपन्न

ओरोस पोलीस परेड मैदान येथे “अवकाश दर्शन” कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी :

 

विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य यांना अवकाश व ग्रहांची ओळख व्हावी, तसेच त्यांना टेलिस्कोपव्दारे ते प्रत्यक्ष बघून त्यांची माहिती मिळावी. याकरीता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली “अवकाश दर्शन” कार्यशाळा पोलीस परेड मैदान, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे दि.28 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. अशी माहिती पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी दिली.

या “अवकाश दर्शन कार्यशाळेकरीता पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी व त्यांच्या पाल्यांनी लाभ घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी खुशी एज्युकेशनः सोशल ट्रस्ट, मुंबई यांचेकडील (सेक्रेटरी) संदिप बेडेकर, विधिता बेडेकर,दिपक फसाळे या तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना ग्रह, तारे, अवकशातील इतर घडमोडींबाबत माहिती देवून त्यानंतर टेलिस्कोपव्दारे ग्रह, तारे दाखविले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधून “अवकाश दर्शन” कार्यशाळेचे आयोजन करून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पाल्यांना ग्रह, तारे, अवकाशातील घडामोडी याबाबत बहुमोल माहिती व अवकाशातील ग्रह, तान्यांचे दर्शन घडविल्याबद्दल पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे सर्वांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा