You are currently viewing १२ डिसेंबरला सातार्डा श्री रवळनाथ देवस्थानचा दिवजांचा जत्रोत्सव

१२ डिसेंबरला सातार्डा श्री रवळनाथ देवस्थानचा दिवजांचा जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सातार्डा गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवस्थानचा दिवजांचा जत्रोत्सव १२ डिसेंबरला उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. भाविकांची गाऱ्हाणी, दुपारी नैवेद्य होणार आहे. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे. दीपस्तंभावरील दीप उजळण्यात येणार आहेत. त्यानंतर राजाधिराज कार्यक्रम होणार आहे. रात्री १ वाजता आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा