You are currently viewing उद्यापासून टेंब्ये स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळा

उद्यापासून टेंब्ये स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळा

कुडाळ / माणगाव :

 

सिंधुदुर्ग व गोवा येथील श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तभक्त परिवार यांच्या वतीने ८, ९ व १० डिसेंबरला दोडामार्ग ते माणगाव श्रीमद परमहंस परी व्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजता माणगाव येथे पालखी आणण्यासाठी दोडामार्ग गणपती मंदिर येथून प्रस्थान, सकाळी ९ वाजता माणगाव येथे स्वामी जन्मस्थान येथे पालखी पूजन, ९.३० वा. माणगावहून  दोडामार्गच्या दिशेने पालखी प्रस्थान, ११ वा. मणेरी दत्त मंदिर येथे आगमन, पालखी पूजन, दुपारी १२ वा. मणेरी कुबलवाडी येथे आगमन, पूजन, आरती व दुपारी विश्राम कुबल व परिवारातर्फे महाप्रसाद, दुपारी २ ते ३ भाविकांसाठी दर्शन, ३.३० वा. दोडामार्गला प्रस्थान, ४ वा. घाटवाडी मदन सावंत व मित्र परिवारातर्फे पूजन, ४.३० वा. सुरुचीवाडी येथे दर्शन व पूजन, ५.३० वा. आंबेली देऊळवाडी येथे विठोबा पालयेकर व मित्र परिवारातर्फे पूजन, सायंकाळी ६ वा. पालखी प्रस्थान, झरेबांबर चाळेश्वर मंदिर, दीपक गवस यांच्याकडे पूजन, ७ वा. आंबेली माणगावकरवाडी येथे प्रस्थान, ७.३० वा. दत्त मंदिरामध्ये पालखी पूजन, महाप्रसाद नितीन गवस व ग्रामस्थ मंडळी, रात्री पालखी मुक्काम.

शनिवार ९ डिसेंबर पहाटे ५ वा. आरती, ५.१५ वा. पालखी दोडामार्गसाठी प्रस्थान, ५.४५ वा. पालखीचे गणपती मंदिर येथे आगमन, ६ वाजता अभिषेक पूजन, ६.३० वा. गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान, ८ वा. मंदार सभागृह सासोली येथे पालखी पूजन, ८.३० वा. प्रस्थान, १०.३० वा. कळणे येथे आगमन, ११ वा. पालखी प्रस्थान, १२.३० वा. श्रीदेवी माऊली मंदिर आडाळी येथे पालखी स्वागत, पूजन व महाप्रसाद दुपारी १.३० वा. आडाळी ग्रामस्थ मंडळ, २.३० वा. पालखी प्रस्थान, ४ वा. डेगवे पानवळ येथे पूजन, ४.३० वा. बांद्याकडे प्रस्थान, ५.३० वा. संत सोहिरोबानाथ मंदिर बांदा येथे पूजन, ६ वा. इन्सुलीकडे प्रस्थान, ६.४५ वा. दत्त मंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व प्रस्थान, ७.४५ वा. संत सोहिरोबानाथ साक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे आगमन, स्वागत, पालखी पूजन, आरती, भजन व महाप्रसाद, पालखी मुक्काम.

रविवार १० डिसेंबर पहाटे ५ वा. आरती, ५.३५ वा. पालखी पूजन व माजगावकडे पालखी प्रस्थान, ६.४५ वा. माजगाव येथे पालखी आगमन व पालखी पूजन, ७.१५ वा. पालखी सावंतवाडीकडे प्रस्थान, ८ वा. टेंब्येस्वामी दत्त मंदिर सावंतवाडी खासकिल वाडा येथे पालखीचे आगमन, स्वागत, पूजन व आरती, ९ वा. पालखी माणगाव कडे प्रस्थान, १०.१५ वा. आकेरी येथे पालखी आगमन, १०.३० वा. पालखी माणगाव कडे प्रस्थान, ११.३० वा. माणगाव तीठा येथे पालखी आगमन, पूजन व प्रस्थान, १२.३० ते १ वा. पालखी श्री टेंब्येस्वामी जन्मस्थान येथे आगमन, दुपारी २ वा. महाप्रसाद, ३ वा. मनोगत व पालखी सांगता होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा