सावंतवाडी :
माडखोल गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ८ डिसेंबरला संपन्न होत आहे. उद्या सकाळपासून केळी-नारळ ठेवण्यासाठी सुरुवात होणार आहे. रात्रौ पालखी सोहळा तसेच आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.