You are currently viewing मुणगेचा ‘अ’शांत बनला मटका उद्योगपती..

मुणगेचा ‘अ’शांत बनला मटका उद्योगपती..

*चंद्रावरील ‘गो’रे च्या आशीर्वादाने मटका कंपनी तेजीत*

 

कणकवली (बेळणे) :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेजीत चालणारा व्यवसाय म्हणजे दारू आणि मटका. या दोन्ही व्यवसायांना विनासायास पाठबळ मिळते ते खाकीच्या शिलेदारांचे. कणकवली जवळील बेळणे येथे अलीकडेच मोठा गाजावाजा करीत ऑफर आणि भेट वस्तूंचा पाऊस पाडत नव्याने सुरू झालेल्या मटका कंपनीला खाकिचा चंद्रावरील ‘गो’रे चा आशीर्वाद लाभला. ‘गो’रे च्या आशीर्वादाने मुणगे येथील गवंडी काम करणाऱ्या अशांत याची मटका कंपनी तेजीत आली आहे.

पारावराचा *अतुल* निय हा मुख्य मालक देखील या मटका कंपनीच्या जीवावर आपल्या १०% व्याजाने पैसे कर्जाऊ देण्याच्या धंद्यात आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे “अतुल” आणि “अशांत” ही जोडगोळी मटका उद्योगामुळे उद्योगपतींच्या यादीत मानाने स्थान मिळवत आहे. गवंडी काम करणारा अशांत उद्योगपती बनल्याने कमालीचा आक्रमक झाला असून मटका बीट वाढविण्यासाठी त्याने क्रेडिट देखील देण्यास सुरुवात केली आहे. खाकीचा आशीर्वाद लाभल्यावर काय करता येते याचे उत्तम उदाहरण बेळणे येथील मटका उद्योगामुळे जिल्हावासियांना पहावयास मिळत आहे.

एकीकडे जिल्ह्यातील खाकी नावाजत असताना दुसरीकडे बदनाम का होते..? असा प्रश्न जिल्हावासियांना पडत आहे. याकडे गांभीर्याने पाहणार आहेत की मटका उद्योगाची पाठराखण करणार..? असाही प्रश्न उभा राहत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + six =