कांजूरमार्ग गाबीत समाजाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव व मौलिक मार्गदर्शन
मुंबई –
कांजूरमार्ग गाबीत समाज संस्था अध्यक्ष गणेश फडके यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे चांगल्याप्रकारे आणि चांगल्या पद्धतीने काम चाललं आहे. त्यातून समाजाविषयी सर्वाप्रती व्यवस्थापन असल्याचे दिसून येते असे मुंबई महापालिका माजी शिक्षणाधिकारी डॉ. जे. आर. केळुसकर यांनी यंग बाईज स्पोर्ट्स क्लब मैदान कांजूरमार्ग येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुणवत्ताधारक विद्यार्थी व पालक यांना सन्मानित करताना प्रतिपादन केले. यावेळी कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत, महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनुजा पराडकर, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर , व्यावसायिक उमेश धुरी, खजिनदार रुपेश केरकर, माधुरी बांदकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. जे. आर. केळुसकर पुढे म्हणाले की , जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना तुमचे ध्येय काय आहे? हे निश्चित करा ! एक मुलगी व वडील सर्कस पाहण्यास गेले. वडिलांनी मुलीला विचारलं की, बाळा तुला काय आवडले ? दोरी ! मग तिने वडिलांना विचारलं बाबा तुम्हाला काय आवडले? जाळे मग यश मिळेपर्यंत मार्ग सोडणार नाही. असा निर्धार कर! तुम्ही सर्वं विद्यार्थ्यांनी हाच कानमंत्र लक्षात घेऊन जीवनात पालकांचे जाळे बना! हे नमूद केले. बर्वे शाळेच्या मुख्याध्यापिका महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनुजा पराडकर यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करा. आज समाजात कमालीची व्यसनाधीनता वाढली असल्याचे सूतोवाच करून या सहज घडण्याऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले. कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांनी आपण सलग तीस वर्षे उद्योग क्षेत्रात असून सेल्समन म्हणून सुरूवात केली. चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी नोकरी देणारे व्हा ! त्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे असे विषद केले. जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केळुसकर हे रात्रशाळेचे विद्यार्थी तर कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत या दुहेरी व्यक्तीमत्वानी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग कसा काढला हे लक्षात आणून देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे सांगितले. गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष गणेश फडके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात घ्यावे कि पालक हे आपले पहिले गुरू आहेत. कधीही त्यांना विसरू नका म्हणजे तुमचा मार्ग सुखकर होईल असे म्हणाले. व्यावसायिक उमेश धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष संदेश उपरकर, कोमल केळुसकर, दिक्षा कुबल, सहसचिव उमेश केळुसकर आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्य यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश फडके यांनी अतिशय सुबक शब्दात केले.