कोकण कला संस्थेतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त बांदा येथे जनजागृती रॅली
बांदा
जागतिक एड्स निर्मुलन दिनाच्या निमित्ताने बांदा येथे आज कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग व गोगटे – वाळके महाविद्यालय बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहरात लोकांमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बांदा सर्कल पासून बांदा बाजारपेठ ते बांदा बसस्टँड पर्यंत काढण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. काजरेकर, एनएसएस विभागाचे प्रा.किशोर म्हेत्रे, एनएसएस विभागाच्या सदस्या प्रा. रश्मी काजरेकर, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. डॉ. वालावालकर, प्रा. रमाकांत गावडे, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक बाबासाहेब वाघमारे, समुपदेशक समीर शिर्के, अवंती गवस, प्रथमेश सावंत, भावना साटम, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, बाळकृष्ण शेळके व तसेच एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीच्या माध्यमातुन लोकांमध्ये एचआयव्ही एड्स विषयीची जागरूकता निर्माण व्हावी. एडस् विषयीचे गैरसमज दुर व्हावेत या उद्देशाने रॅली मध्ये विविध घोषवाक्ये यांची फलके, बॅनर व घोषवाक्यांच्या घोषणा देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. गोगटे -वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य काजरेकर, डॉ. वालावालकर, किशोर म्हेत्रे, तसेच कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक बाबासाहेब वाघमारे यांनी रॅली दरम्यान मार्गदर्शन केले. या जनजागृती रॅली साठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पा विषयी बांदा बस स्टँड येथे कोकण संस्थेने समुपदेशक समीर शिर्के यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ, विद्यार्थिनीना व इतर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कोकण संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पाबाबत माहिती दिली. रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.