म न से च्या वतीने covid-19 सेंटर च्या साफसफाईची पोलखोल

म न से च्या वतीने covid-19 सेंटर च्या साफसफाईची पोलखोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने covid-19 सेंटर च्या साफसफाईची पोलखोल

बांदा / प्रतिनिधी :-
डिवाइन मर्सी शेरले सेंटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे सध्या या सेंटरमध्ये 30 पेक्षा जास्त रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांना याविषयी जाब विचारला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की संबंधित साफसफाईचा ठेका हा ठेकेदाराला दिला असून त्याने ते करणे आवश्यक आहे.

परंतु आतूनच आम्हाला अशी माहिती मिळाली की गेले आठ दिवस त्याठिकाणी साफ-सफाई झालीच नाही तसेच त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून असलेले होमगार्ड यांच्या सुरक्षेसाठी त्याठिकाणी पी. इ. पी. देणे आवश्यक होते परंतु ते शासनाने त्यांना दिले नाही यावरून आम्हाला समजले हे सेंटर रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे आमची मागणी आहे की सदर ठेकेदाराला दिलेलं ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा व तेथील रुग्णांना चांगल्या दर्जाची सुविधा द्यावी.

याबाबतचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊ तसेच संबंधितांवर व त्वरित कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर, उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, सुधीर राऊळ, देवेंद्र कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा