You are currently viewing क्षमा एक अप्रतिम गुण
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

क्षमा एक अप्रतिम गुण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*क्षमा एक अप्रतिम गुण*

लहानपणापासून येशू ख्रिस्ताचे एक वाक्य मनावर कोरलेलं आहे. क्रुसावरचा जखमी येशू म्हणतो,
“ प्रभू यांना कळत नाही आहे की ते काय करत आहेत. यांना क्षमा कर.”

खरोखरच “क्षमा वीरस्य भूषणम् “
बलवान मनुष्याचं आभूषण, परम गुण,सर्वश्रेष्ठ दान क्षमादान हेच आहे

क्षमा वृत्ती आणि क्रोध हे एकमेकांना छेदणारे भाव आहेत.

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।

क्रोधामुळे भ्रम होतो आणि भ्रमामुळे बुद्धी नष्ट होते म्हणूनच क्रोध आवरून समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन मनापासून क्षमा करणे हेच शांतीचे शस्त्र आहे. क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा एक पावित्र्याचा प्रवाह आहे. क्षमा मागितल्याने कुणाचा मान कमी होत नसतो आणि क्षमा केल्याने सुसंस्काराचे पालन होत असते. क्षमा हे एक अहिंसक अस्त्र आहे, प्रेमाचं माध्यम आहे आणि विश्वासाचं बळ आहे. मनातल्या तिरस्कारयुक्त भावना शांत करण्याचं साधन आहे. सृजनशीलतेचा तो एक सन्मान आहे म्हणूनच क्षमा हा अप्रतिम गुण आहे.

माध्यमांचा आपल्यावर नकळत पगडा असतो. आपण बघत असलेल्या मालिकांतून आपल्या कानावर ही वाक्ये नेहमी अक्षरशः आदळत असतात,

“मै तुम्हे देख लूंगा ।”
“ मुझसे बढकर कोई बुरा नही।”
“ आज पर्यंत माझी मैत्री पाहिलीस आता माझी दुश्मनी अनुभव.”
“ बघ आता मी तुझे कसे हाल करतो ते”
“ देख एक दिन तू गिडगीडाके मेरे पाव पर खुद आयेगा।” मात्र या सूडबुद्धी वाक्यांचा थोडं थांबून विचार केला तर ही सारी रक्त उकळवणारी, अशांतता माजवणारी, वाद— भांडण वाढवणारी हिंसक भाषाच आहे. याने नक्की काय साध्य होईल? या भीषण प्रतिक्रियांवर मात करायची असेल तर क्षमा हा एकच मार्ग उरतो नाही का?

महात्मा गांधी म्हणत ,”एका गालावर कोणी थप्पड मारली तर आपला दुसरा गाल पुढे करावा.” पण या त्यांच्या भाष्यावर सर्वसाधारणपणे अशी प्रतिक्रिया असते की,” मग काय अन्यायाचा प्रतिकार करायचाच नाही? शस्त्रधारी पुढे नि:शस्त्र होणे म्हणजे पराभवच नव्हे का? काट्यानेच काटा काढावा ना? ठोशास प्रति ठोसा, शठम प्रति शाठ्यम्, जशास तसे याच प्रतिकारक्षम वृत्तीच्या पार्श्वभूमीवर क्षमा या शस्त्राने काय होणार? हेही खरं आहे. ही प्रतिक्रिया ही स्वाभाविकच आहे, नाकारण्यासारखी नाही.
एखाद्यानं खून केलाय, बलात्कार केलाय ,भ्रष्टाचार केलाय, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केले आहे,विद्रोह केलाय, अराजक माजवलेय् , त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची की त्यांना क्षमा करायची? मंडळी या सगळ्या शंका रास्तच आहेत. अजिबात चुकीच्या नाहीत पण क्षमा हा परमात्म्याचा गुण आहे एखाद्या गुन्हेगाराला क्षमा करणे म्हणजे त्याला स्वैर सोडणे, पुन्हा तसाच दुसरा गुन्हा करण्यास मुक्त करणे हा अर्थ अभिप्रेतच नाही.

FORGIVE THE SINNER BUT NOT THE SIN असं म्हटलेलं आहे. या येथे क्षमा याचा अर्थ खूप व्यापक आहे. लहान सहान बाबी बाबत,म्हणजे मतभेद,कौटुंबिक वाद,गैरसमज,यासाठी आपण आय एम सॉरी म्हणू शकतो, किंवा झालं गेलं विसरून जाऊ मी तुला माफ केले आहे असेही म्हणू शकतो. तिथे क्षमा करणे किंवा क्षमादान याला मनाचा उदात्तपणा, मोठेपणा, एक नम्रता गुण अशी बिरूदे आपण सहज लावू शकतो. पण ज्यावेळी एखादी गंभीर, घातक समस्या निर्माण होते त्यावेळी क्षमा हा शब्द निराळा अर्थ घेऊन येतो. इथे दंडात्मक कारवाई ही अपेक्षित आणि योग्यच आहे पण त्या पलीकडे जाऊन गुन्हेगारी वृत्तीचं समूळ उच्चाटन होण्याकरिता क्षमा याचा अर्थ —”सुधारण्यासाठी एक तरी संधी” असाही असू शकतो आणि अशा तऱ्हेचे प्रयोग समाजात करू पाहणारे मानवतावादी लोक आहेत.
किरण बेदी यांनी तिहार तुरुंगात जेलर म्हणून काम करत असताना कैद्यांच्या मानसिकतेत संपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मानवतावादी भूमिकेतून प्रयत्न केले आणि ते यशस्वी ही झाले.
गिरिजा कीर या सुप्रसिद्ध लेखिकेने जन्मठेप भोगणाऱ्या कैद्यांशी सतत बारा तेरा वर्षं संवाद साधून त्यांना एका चांगल्या जीवन प्रवाहात आणून दाखवले.
याच पार्श्वभूमीवर मला *दो आँखे बारह हाथ* या अत्यंत गाजलेल्या सिनेमाची ही आठवण होते.गुन्हेगारांचा तिरस्कार न करता त्यांच्या विकृतीवर मात करण्यासाठी दाखवलेली ममता अथवा मैत्रीचा दिलेला हात..
ऐ मालिक तेरे बंदे हम । या भजनांनी त्या अट्टल गुन्हेगारांवर झालेला अपूर्व परिणाम बघताना अंत:करण हेलावून जाते आणि या इथेच क्षमा या शब्दाला एक निराळीच झलक मिळते, एक निराळा अर्थ प्राप्त होतो. इथे क्षमा करणे म्हणजे नक्की काय करणे याचे खरे दर्शन घडते. मानवतावादी भूमिकेतून केलेली क्षमा ही एक थेरेपी ठरते.

चित्त शुद्ध तेथे शत्रू मित्र होती
व्याघ्रही न खाती सर्प तया …

ज्याचे चित्त शुद्ध तोच खऱ्या अर्थाने क्षमा करू शकतो. आणि त्याच्या क्षमा करण्याने क्रांती घडू शकते. म्हणूनच ना आपल्यासाठी उच्च कोटीची क्षमाशील वृत्ती असणारा देव असतो. मग तो कुठल्या अज्ञात शक्तीच्या रूपात असेल अथवा मनुष्य रूपातही असेल पण परमेश्वराची पूजा केल्यानंतर आपण हाच मंत्र म्हणतो.

। आवाहनम न जानामि
न जानामि तवार्चनम्
पूजाश्चैव न जानामि
क्षम्यतां परमेश्वर।।

जैन धर्मात पर्युषण पर्वात क्षमापना करताना म्हटले जाते,
मन वचन कायासे
जानते हुए अजानते हुए
आपका दिल दुखाया हो तो
मिच्छामी दुक्कडम् ..

म्हणूनच क्षमा हेच शस्त्र आहे. हेच शास्त्र आहे आणि हिंसेवरचं अहिंसक प्रभावी ईश्वरीय अस्त्र आहे.

राधिका भांडारकर पुणे.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा