You are currently viewing उद्योग मंत्री उदय सामंत उद्या जिल्हा दौऱ्यावर

उद्योग मंत्री उदय सामंत उद्या जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग :

 

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उद्या सकाळी ११.१५ वा. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोसकडे प्रयाण. सकाळी ११.४५ वा. मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत भारतीय नौसेना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग). दुपारी १२.१५ वा. पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे समवेत मोटारीने ओरोस जि. सिंधुदुर्ग येथून मालवणकडे प्रयाण. दुपारी १२.४० वा. टोपीवाला हायस्कूल येथील हेलिपॅड व सेफ हाऊसची पाहणी. दुपारी १ वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभिकरण कामाची पाहणी. दुपारी १.१५ वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत तारकर्ली येथील विविध कामांची तसेच एम.टी.डी.सी. विश्रामगृहाची पाहणी. दुपारी २ वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत कुंभारमाठ येथील हेलिपॅड व सेफ हाऊसची पाहणी. दुपारी २.१५ वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत मोटारीने चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी २.४५ वा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांचे समवेत चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व चिपी विमानतळ पाहणी व आढावा. दुपारी ३.१५ वा. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ येथून विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा