पालकमंत्री नितेश जी राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने साजरा.
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेशजी राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने कसाल ग्रामपंचायत सभागृहामध्ये सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. पालकमंत्री श्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरातील दोनशेहून अधिक दिव्यांग बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते. दिव्यांग बांधवांनी संगीत खुर्ची ही स्पर्धा लहान मुले,मुले तसेच महिला ,पुरुष दिव्यांग बांधव सहभागी होऊन यशस्वीरित्या पार पाडली. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले .तसेच दिव्यांग विद्यार्थी, पाल्यांना मोफत वह्या वाटप , व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी आपल्या मनोगतातून भर पाऊस असताना सुद्धा जिल्ह्याभरातील दिव्यांग बांधव एकत्र येऊन आपल्या लाडक्या पालकमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करतात याचे कौतुक केले .तसेच भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक श्री. अनिल शिंगाडे हे दिव्यांगासाठी तळमळीने करत असलेली कामे व त्यामध्ये त्यांना मिळणारा आनंद याविषयी आपले मत मांडले दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत तसेच तालुका निहाय दिव्यांग बांधवांना एकत्र करून त्यांचे प्रश्न त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू असे आश्वासन दिले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.रणजीत देसाई यांनी आपल्या भाषणातून दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून केलेले सहकार्य तसेच पालकमंत्री श्री नितेशजी राणे जिल्हा विकास करण्यास नियमित पुढे असतात .त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी कामना केली. माजी पंचायत समिती सदस्य श्री.संदीप गावडे यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यामध्ये पालकमंत्री श्री नितेश जी राणे यांच्यामार्फत होत असलेला विकास तसेच दिव्यांगांप्रती आदरभावना व्यक्त केली. कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमास दाखवलेली उपस्थिती तसेच पार पडलेल्या स्पर्धांचे कौतुक केले. वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नेतेशजी राणे यांना शुभेच्छा दिल्या.
भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक श्री.अनिल शिंगाडे यांनी आपल्या मनोगतात भर पावसात दिव्यांग बांधव या ठिकाणी येणे ही खूप कठीण गोष्ट असताना सुद्धा तळमळीने वेळेत हजर राहून दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी संगीत खुर्ची ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली तसेच भाजप दिव्यांग विकास आघाडी ही दिव्यांगांच्या विकासासाठी तसेच समाज उपयोगी कोणकोणते कार्य करते याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास श्री.सुनील तांबे श्री .श्यामसुंदर रोड श्री.सदाशिव राऊळ श्री .भरत परब श्री. मनोज सतवसे तसेच साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे कर्मचारी सौ.प्रणाली शिर्के सौ.संजना गावडे कु.विशाखा कासले ,अभय शिंगाडे ,प्रशांत कदम विजय कदम आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.दयानंद गावकर यांनी केले .तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री .अनिल शिंगाडे सर यांनी केले.
______________________________
*संवाद मीडिया*
🚙🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗
*आमच्यासोबत काम करण्याची संधी!*🕴️
*MAI HYUNDAI*
*👉त्वरित पाहिजेत*
*🚕 कार ईव्हॅल्युएटर – 1*🚕🚗
*👨💼आवश्यक पात्रता*👇
*▪️किमान 2 वर्षांचा कार व्हॅल्युएशनचा अनुभव*
*▪️वापरलेल्या कार्सच्या बाजारभावाची जाण*
*▪️गाडीची स्थिती ओळखण्याचे कौशल्य*
*▪️रिपोर्ट व संवाद कौशल्य*
*▪️व्हॅल्युएशन टूल्स/सॉफ्टवेअरचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य*
*सविस्तर अर्ज व फोटोसह स. 10 ते सायं. 6 पर्यंत समक्ष भेटा अथवा अर्ज करा.*
*कुडाळ & कणकवली*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 26 वर्षे*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ*
*संपर्क:- 7410006037*
*ई-मेल : | tmsnd@maihyundai.in*
*Terms and conditions*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/174709/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*