You are currently viewing सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

*सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध*

पिंपरी

विविध भारती म्युझिकल इव्हेंट आयोजित ‘एक प्यार का नगमा हैं’ या हिंदी – मराठी लोकप्रिय सुमधुर गीतांच्या विनामूल्य मैफलीत गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात रसिक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेटे, सुचिता शेटे, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक महेंद्र चिंचवडे, प्रसन्न वंजारी, राजू भिंगारे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, आनंद मुळूक, आयोजक गीता कोसंदर, नितीन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराओके पार्श्वसंगीताच्या तालावर “एक प्यार का नगमा हैं…” , “दिल की नजर सें…” , “जिंगल बेल…” , “निंद ना मुझको आये…” , “ये हवा मेरे संग संग चल…” , “हसता हुआं नुरानी चेहरा…” , “सासोंकी जरुरत हैं…” , “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे…” , “ही पोरगी साजूक तुपातली…” अशा
हिंदी – मराठी लोकप्रिय गीतांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. काही द्वंद्वगीतांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश करीत उत्स्फूर्त टाळ्यांची दाद दिली. अनिल जंगम, सोमा बोस, दैवशाला घाटगे, भाविका साबणे, राजेश किबीले, नेताजी पाटील, शुभांगी पवार, नंदकुमार कांबळे, अरुण सरमाने या सहभागी गायक कलाकारांना शैलेश घावटे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या दरम्यान विविध भारती म्युझिकल इव्हेंट या संस्थेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल संचालित सावली निवारा केंद्र या संस्थेला आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. संस्थेचे व्यवस्थापक गौतम थोरात, सामाजिक कार्यकर्ते अग्नेश अमृस फ्रान्सिस, लाभार्थी सुनील जोशी यांनी मदतनिधी स्वीकारला. त्यानंतर उद्योजक उमाकांत पवार, नवनाथ कोलते, अन्वर पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये सानिका कांबळे, साक्षी भिंगारे, अक्षदा यादव या भाग्यवान विजेत्या ठरल्या.

अनिल घाटगे, विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी मैफलीच्या संयोजनात परिश्रम घेतले. लटके आणि जगद्गुरू गायकवाड यांनी रंगमंच सजावट केली; तर तुषार कदम यांनी छायाचित्रण केले. अरुण सरमाने यांनी निवेदन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा