You are currently viewing फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या व्हॅनवर झाडाची फांदी कोसळली.. 

फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या व्हॅनवर झाडाची फांदी कोसळली.. 

कणकवली

कणकवली तालक्यातील डामरेहुन फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅनवर झाडाची फांदी कोसळून अपघात घडला. अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली मात्र गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले.
व्हॅनमालक प्रकाश जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह फोंडाघाटला जात होते. व्हॅनमध्ये महिलांसह लहान मुलेही होती.

चालत्या व्हॅनवर दर्शनी काचेवर रस्त्यालगत च्या झाडाची फांदी कोसळून अपघात घडला. फोंडाघाट हवेलीनगर येथे भारत गॅस एजन्सी समोर हा अपघात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी व्हॅनचे मात्र नुकसान झाले आहे. माजी सभापती संदेश पटेल यांनी या घटनेची माहिती तात्काळ महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. फोंडाघाट तलाठी जैनवार यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे यांनाही पटेल यांनी दुर्घटनेची माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =