You are currently viewing वेंगुर्ले ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले :

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी, खानोली, मातोंड, पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी, मातोंड, पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. तसेच खानोली उपसरपंच निवडीत भाजपा व शिंदे गटाची युती होऊन पहिले अडीच वर्षे हे शिंदे गटाला उपसरपंच पद देण्यात आले.

आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत वायंगणी ग्रामपंचायतीत रविंद्र सहदेव धोंड (भाजपा), पेंडुर ग्रामपंचायतीत महादेव विजय नाईक (भाजपा), मातोंड ग्रामपंचायतीत आनंद रामचंद्र परब (भाजपा) तसेच खानोली ग्रामपंचायतीत सचिन आनंद परब (शिंदे गट) हे उपसरपंचपदी विराजमान झाले.

वेंगुर्ले तालुक्यामध्ये सरपंच निवडणुकीतही चार पैकी तीन ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच बहुमताने निवडून आले होते. तसेच उपसरपंच निवडीत ही चार पैकी तीन ठिकाणी भाजपाचे उपसरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे वेंगुर्लेत भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले.

वायंगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंच पदाचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला होता परंतु ९ पैकी ७ सदस्य भाजपाचे निवडून आले होते. आज उपसरपंच निवडीत भाजपाचे रविंद्र सहदेव धोंड हे बिनविरोध निवडून आले. यावेळी भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख व माजी सरपंच शामसुंदर मुननकर, माजी सरपंच तात्या केळजी, रविंद्र पंडीत, *ग्रामपंचायत सदस्य* – अनंत केळजी, महेश मुननकर, अनंत मठकर, राखी धोंड, विद्या गोवेकर, सविता परब, बुथप्रमुख आबा धोंड, संतोष साळगावकर, सुधर्मा कावले, दिगंबर धोंड, राकेश धोंड, विष्णु म्हारव, समिर धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा