You are currently viewing कणकवलीत स्वस्त दराने कांदा विक्री

कणकवलीत स्वस्त दराने कांदा विक्री

आमदार नितेश राणे यांची संकल्पना

कणकवली

भाजप आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजपा किसान मोर्चा च्या माध्यमातून कणकवलीत अवघ्या 30 रुपये किलो दराने कांदे विक्री करण्यात आली.

सुमारे पाच टन कांदा रुपये 1 लाख 50 हजार एवढ्या किमतीचा कांदा सांगवे वि.वि. सोसायटी यांनी तीस रुपये किलो अल्पदरात विक्री केली.
त्याचा शुभारंभ जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, सुरेश सावंत, सोसायटी चेअरमन वाळके, सरपंच रमेश म्हापणकर तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.

येथील राणे संपर्क कार्यालयासमोर कांदा खरेदीसाठी कणकवली येथे मोठी गर्दी झाली होती. कमी दराने कांदा उपलब्ध केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =