केबल मालकांनी स्वतंञ पोलची उभारणी करावी

केबल मालकांनी स्वतंञ पोलची उभारणी करावी

केबल मालकांनी स्वतंञ पोलची उभारणी करावी – प्रथमेश सावंत

दोडामार्ग / सुमित दळवी :-
तिलारी दोडामार्ग महामार्गावरच्या बाजुने स्टीट लाईटची उभारणी करण्यात आलेले आहे परंतु त्या पोलवर टिव्ही केबल तसेच अन्य काही केबल देखील टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या पोलवरुन केबल तात्काळ हटवाव्यात अशी मागणी घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
तिलारी मार्गावर स्टिट लाइटची उभारणी करण्यात आली आहे त्यावर टिव्ही केबल व अन्य केबल टाकणार्‍या मालकांनी या पोलचा आधार घेत यावर आपल्या केबल टाकल्या परंतु ह्या केबल देखील योग्य पध्दतीने टाकल्या गेल्या नसल्याने याचा धोका निर्माण झाला आहे.ह्या केवल विद्युतवाहीन्यांच्या अगदी जवळ टाकण्यात आल्या असल्याने या केबलचे कवरिंग गेल्यास यातुन विद्युत प्रवाह जावुन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी सुद्धा केबलकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे या केबल मालकांनी स्वतंञ पोलची उभारणी करुन आपल्या केबल टाकाव्यात येत्या आठ दिवसात या केबल न हटविल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत यांनी महावितरणला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा