You are currently viewing नुतन वेंगुर्ला तालुका व नगरपरिषद दक्षता समितीची पहिली सभा संपन्न….

नुतन वेंगुर्ला तालुका व नगरपरिषद दक्षता समितीची पहिली सभा संपन्न….

आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थतीत सभा संपन्न..

वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वेंगुर्ला ता. व नगरपरिषद दक्षता समिती गठीत करण्यात आल्यानंतर त्यांची पहिली सभा येथील तहसीलदार कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पाडली.
सभेमध्ये केसरकर यांनी मार्गदर्शन करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनांचा इष्टांक तपासून आवश्यक त्या वाढीव इष्टांकाची मागणी करण्याबाबतचे पत्र शासन सादर करा.

तालुक्यातील सर्व रास्त भावाच्या धान्य दुकान निहाय शिधापत्रिका मधील मयत व स्थलांतरित लाभार्थ्यांची नावे तात्काळ कमी करण्यात यावी. केरोसीन पात्र लाभार्त्याना आवश्यक केरोसीन उपलब्ध होण्याकरिता किरकोळ केरोसीन दुकान निहाय पात्र शिधापत्रिकांचा याद्या घेण्यात येऊन गॅसधारक शिधापत्रिका वगळून साठा निश्चित करावा तसेच तालुक्यातील आंबा बागायतदार, मच्छिमार नौकायांना व दहन प्रक्रियेसाठी आवश्यक केरोसीन साठा फ्री सेल मधून उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा. खानोली, वायंगणी रास्त भावाचे धान्य दुकान त्याच्या गावात सुरू होण्यासाठी नव्याने जाहीरनामा काढण्यात यावा. गावनिहाय बचतगटांना सदरची धान्य दुकाने देण्यासाठी आवश्यक ती बैठक आयोजित करावी अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, ता. पुरवठा अधिकारी प्रीतम वाडेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पं.स सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, यांच्यासह नगरपरिषद दक्षता समिती सदस्य मंजुषा आरोलकर, श्वेता हुले, महेश डीचोलकर,कासीम शेख, लवु तेरसे, पेद्रु लॉड्रीक्स,महादेव शिरसाट, वृषाली जाधव तसेच ता. दक्षता समिती सदस्य सुचिता वजराठकर,मनाली हळदणकर, नम्रता बोवलेकर, योगेश कुबल, दीपक जाधव, झिलु गोसावी, सुधाकर राणे व ता. गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 13 =