You are currently viewing रामलिंग चौडेश्वरी मंदिराचा कलशारोहन महोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा

रामलिंग चौडेश्वरी मंदिराचा कलशारोहन महोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी-

येथील दातार मळा परिसरातील श्री रामलिंग चौडेश्वरी लिंगायत कोष्टी समाज मंदिराचा कलशारोहण महोत्सव भक्तिमय वातावरणात व अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. २ मे ते १२ मे दरम्यान झालेल्या या महोत्सवात विविध धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले. तसेच श्री. स्रो. ब्र. जगद्गुरू चिक्क रेवणसिध्द शिवशरण स्वामीजी, श्री सद्गुरू रेवणसिध्द स्वामीजी संस्थान मठ (अक्कलकोट) यांच्या अमृतवाणीनंतर शुक्रवारी दुपारी महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता झाली. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
येथील दातार मळा परिसरातील श्री रामलिंग चौंडेश्वरी लिंगायत कोष्टी समाज मंदिराचा कळसारोहण महोत्सवास मंगळवार २ मे पासून सुरुवात झाली. अकरा दिवस चाललेल्या या महोत्सवात दररोज पहाटे देवी पारायण श्री वे. गुरय्या स्वामी मेत्री यांच्याकडून पठण झाले. त्यानंतर सकाळी राजशेखर निंबाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवनाम जपानुष्ठान पार पडले. तसेच दररोज सायंकाळी श्री. धानम्मादेवी (गुड्डापूर) पुराण कार्यक्रम श्री. ष. ब्र. अभिनव रेवणसिध्द पट्टदेवरू गुरू हिरेमठ (मैंदर्गी) यांच्या अमृतवाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले. प्रवचन झाल्यानंतर प्रसादाचेही नियोजन अतिशय उत्तम रित्या करण्यात आले होते यामध्ये रोज महिला मंडळी व युवक कार्यकर्ते यांनी अप्रतिम रित्या आपला सहभाग नोंदवीला.
तर महोत्सवातील मुख्य दिवशी बुधवार १० मे रोजी महारुद्राभिषेक व होमहवन श्री. वे. सिध्दय्या बुक्का (तोळनूर) व श्री वे. गुरय्या स्वामी मेत्री यांचे मार्गदर्शन, सायंकाळी बमलिंग जेऊर यांच्या नेतृत्वाखाली श्री. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचा भजन आदी कार्यक्रम झाले. गुरुवार ११ मे रोजी कलस व कुंभ यांचे सवाद्य मिरवणूक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी वे. चिदानंद स्वामी यांच्या नेतृत्वाखाली महिला भजन मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम, पुराण कार्यक्रम तर शुक्रवार १२ रोजी सकाळी उपस्थित सर्व महाराजांच्या अमृतहस्ते कलसारोहण, यानंतर सत्कार समारंभ व ओम नमः शिवाय मंत्र घोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महोत्सवात प. पू. १००८ बसवराज स्वामीजी (गुळेदगुड्ड), ष. ब्र. अभिनव रेवणसिध्द पट्टदेवरू (मैंदर्गी), ष. ब्र. चन्नबसव पट्टदेवरू (आळंद), प. पू. अभिनव शिवलिंग स्वामीजी (मादन हिप्परगा), प. पू. शांतविर शिवाचार्य स्वामीजी (मादन हिप्परगा), प. पू. मृत्युंजय स्वामीजी (मैंदर्गी), प. पू. ईश्वरानंद स्वामीजी (सस्तापूर), प. पू. चिद्धघनानंद भारती स्वामी ( जोडकुरळी ) आदींसह समाजातील व विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महोत्सव यशस्वी होण्यासाठी येथील ज्येष्ठ मंडळ, युवक मंडळ व महिला भगिनींचे योगदान लाभले. संपूर्ण महोत्सव काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − four =