You are currently viewing चर्चा तर व्हायलाच हवी

चर्चा तर व्हायलाच हवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*चर्चा तर व्हायलाच हवी*

 

आमच्या परिचितांपैकी एक गृहस्थ आहेत. आता वार्धक्याने प्रकृतीच्या कुरबुरी वाढलेल्या. जेव्हा ते तरुण होते नोकरी करत होते तेव्हा त्यांनी नोकरी एके नोकरीच केली. बायका मुलांकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. सुदैवाने पत्नीला नोकरी असल्यामुळे तिने कसाबसा मुलांचा सांभाळ तरी केला. पण मुलांना मोठं करताना,शाळा कॉलेजसाठी, सणावाराला, दुखण्या-खुपण्याला नवऱ्याकडून काही मदतही झाली नाही आणि तिने मग अपेक्षाही केली नाही. जसं जमेल तसं सगळं तिनं स्वतःच्या हिमतीवर केलं, मुलं मोठी केली,शिकली नोकरीला लागली, अगदी घरही बांधलं. त्यावेळी ते गृहस्थ स्वतःच्याच विश्वात दंग होते. पुढे कालांतराने जेव्हा रिटायर लाईफ जगायची वेळ आली, दवाखान्याच्या चकरा वाढल्या तेव्हा अचानकपणे त्यांना आपण जन्माला घातलेल्या मुलांची आठवण झाली आणि त्यांनी आता आपला सांभाळ करावा ही अपेक्षाही निर्माण झाली. पण मधल्या या कालखंडात पित्याशिवाय राहण्याची त्या मुलांना आणि त्यांच्या आईलाही सवय लागली होती. कसं असतं बघा एखाद्याच्या असण्याची जशी आपल्याला गरज असते, गरजेचे रूपांतर सवयी मध्ये होते तसेच एखाद्याच्या नसण्याची सुद्धा सवय होते. मग त्याचं क्वचित कधीतरी येणं सुद्धा मनाला खटकू शकतं किंबहुना त्या व्यक्तीची अडचण होत जाते. हा तर निसर्गाचा नियमच आहे की जसे पेराल तसेच उगवेल. त्यानं मुलांच्या लहानपणापासून त्यांना उपजत मायेनं वाढवलं असतं, आवश्यक तो वेळ कुटुंबाला दिला असता तर कदाचित चित्र चांगलं दिसू शकलं असतं. कुणी पुढं चालून आपला आधार बनेल म्हणून एखाद्या साठी काही करणं हे आजच्या घडीला योग्य नाहीच.कारण अपेक्षा ठेवून प्रेम केलं तर ते प्रेमच काय? आपण ज्या मुलांना जन्माला घातलं त्याची जबाबदारी सर्वस्वी आपलीच आणि ती मायेची भूक शमणे यातच खऱ्या मातृत्वाची,पितृत्वाची सांगता. त्यापुढे जाऊन मुलांनी आपल्यासाठी काही करणं हा पूर्णपणे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, जो की आपल्या हातात नाही. समजा मुलं खूपच गुणी निपजली,त्यांनी आईवडिलांची सेवा केली तर तो आयुष्यात मिळालेला सगळ्यात मोठा बोनस मानावा. हेही कुठल्या मागच्या जन्मीचं पुण्यं वगैरे असतं असं मला नाही वाटत तर ते जे काही पाप किंवा पुण्य असतं ते याच जन्मातलं याच जन्मी फेडून जायचं असतं. म्हणून तर असं म्हणतात की सतत चांगले विचार करा, चांगली कृती करा,कुणाला अकारण-सकारण दुखवू नका. पण सद्यपरिस्थितीत असं वागणारा माणूस संतपदालाच पोचलेला असेल, नाही का? आपण पडलो सामान्य लोक. आपण प्रवचनाला,भागवत सप्ताहाला जाऊन येऊ पण घरी तसं आचरण करू का? पोथ्या वाचू, पारायणे करू, अन्नदान करू..पण स्वभावाला मुरड घालू का? तुम्ही भगवद् गीता वाचणारे असा,बायबल वाचणारे असा,कुराण वाचणारे असा किंवा गुरू ग्रंथ साहिब वाचणारे असा…त्याप्रमाणे वागणारे असणं खूप अवघड आहे. माणूस त्याच्या स्वभावधर्माला अनुसरूनच जगतो, फक्त माणूस म्हणून तो क्वचितच जगतो.

 

तर गोष्ट होती त्या वृद्ध गृहस्थांची. तसं तर मागची परिस्थिती कशीही असो, वृद्धांची समस्या दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे.

 

“म्हताऱ्यांचे जगणे उसणे असते निव्वळ

मरण्याआधी कणकण मरणे असते निव्वळ ”

 

हा माझ्याच एका गझलेतील शेर आहे. शेवटी प्रत्येकाला म्हातारपण आहे आणि ही कणाकणाने खचत जाण्याची परिस्थिती ही येणार आहे. जोपर्यंत आपल्या वाट्याचं आयुष्य आपण जगत नाही तोपर्यंत यातून सुटकाही नाहीच.

आता समजा मुलांनी सांभाळ नाही करायचा असं म्हटलं तर त्यांनी कुठं जावं?एकतर वाढलेलं आयुष्यमान त्यात शरीराच्या अस्वस्थतेसोबतच वयामुळे एकप्रकारचा विक्षिप्तपणा आलेला असतो.कुठेच कुणाशीच पटत नसतं. कुणालाच कुणाशी जुळवून घ्यायचं नसतं. पेन्शन असेल तर खर्चाचा प्रश्न तरी नसतो पण सगळेच इतके सुखही नसतात. आता हा प्रश्न फक्त कौटुंबिक न राहता सामाजिक झालाय याबद्दल आपल्यापैकी किती जणांना भान आहे? कधीतरी बातमी येऊन थडकते की अमूक तमूक प्रसिद्ध कलाकाराचे शव अशा एकाकी अवस्थेत दोन तीन दिवसांनंतर सापडलं वगैरे वगैरे. त्यानंतर भरपूर चर्चा,मुलांवर उधळलेली मुक्ताफळं, कर्तव्य, सुचवले गेलेले तुटपुंजे उपाय…असं काही बाही गुऱ्हाळ चालू राहतं. पुन्हा थोडे दिवसांनी धूळ खाली बसते. मूळ प्रश्न स्वतःचे अक्राळविक्राळ रूप घेऊन तसेच उभे असतात. किंबहुना ते दिवसेंदिवस वाढत राहतात. जाणीवपूर्वक स्वखुशीने ओल्ड एज होम्स अर्थात वृद्धाश्रम या परिस्थितीला पर्याय ठरू शकतात का? व्यक्ती अगदीच चाले फिरेनाशी झाली तर तिचा सांभाळ कुणी करायचा? आताच्या जगात मुलांपुढच्या समस्याही कमी नाहीत, मग हे निस्तरणार कोण? वेळ आली तर हॉस्पिटल मधे जवळ थांबणार कोण? असे अनेक मुद्दे आहेत. पैशांच्या प्रश्नावर बोलू शकत नाही कारण तो वैयक्तिक आहे. पण माणसांचा प्रश्न मांडणं,त्यावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या चर्चेतून काहीतरी सामाजिक स्तरावर समतोल मार्ग निघणंही तितकेच आवश्यक आहे.

होईल ते होईल,बघू पुढचं पुढं असं म्हणून प्रश्न झटकले जात नाहीत, जाणार नाहीत. तेव्हा

करा,मोकळेपणाने चर्चा करा, मार्ग शोधा.

 

अंजली दीक्षित-पंडित

छत्रपती संभाजीनगर

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा