You are currently viewing धान विक्री 31 जानेवारी पर्यंत करावी

धान विक्री 31 जानेवारी पर्यंत करावी

धान विक्री 31 जानेवारी पर्यंत करावी

सिंधुदुर्गनगरी

 हंगाम 2023-24 मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान विक्री दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात यावी. अशी माहिती डी. आर. पाटील जिल्हा मार्केटींग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील 44 धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्याचा तालुका निहाय तपशिल पुढीलप्रमाणे 1) सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, डेंगवे, तळवडे, भेडशी, इन्सुली, मडुरा 2) कुडाळ तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कुडाळ, माणगाव, कडावल, घोडगे, कसाल, निवजे, निरुखे, आंब्रड, पिंगुळी, गोठोस, वेताळ बांबार्डे, पणदुर, पाठ, हिर्लोक, केरवडे, तुळस,

 3) शेतकरी सह तालुका खरेदी-विक्री संघ लि. कणकवली – कणकवली, सांगवे, घोणसरी, लोरे नं.1, फोंडा 4) वेंगुर्ला तालुका सह. खरेदी विक्री संघ लि.- वेंगुर्ला, होडावडा 5) देवगड तालुका सह खरेदी- विक्री संघ लि. देवगड, पाटगाव, पडेल 6) मालवण तालुका सह खरेदी विक्री संघ लि. पेंडुर, गोठणे 7) वैभववाडी तालुका सह खरेदी विक्री संघ लि. वैभववाडी, करुळ, भुईबावडा 8) सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. ओरोस, कट्टा, मसुरे, तळगाव इत्यादी केंद्रावर धान खरेदी सुरु आहे.

शासनाने पणन हंगाम 2023-24 करीता किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान खरेदी करीता शासनाकडुन प्रति क्विंटल दर रु. 2183/- जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच सदर धान खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन ऑनलाईन शेतकरी नोंदणी करुन धान विक्री करावयाचे आहे. ऑनलाईन शेतकरी नोंदणी करीता दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत आहे. सदर मुदतीत ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करावयाचे आहे त्या शेतकन्यांनी तात्काळ नजीकच्या खरेदी केंद्रावर जावून ऑनलाईन शेतकरी नोंदणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी धान विक्री करीता आणताना सदर धान स्वच्छ, काडीकचरा विरहित व वाळवून आणावे. तरी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक 31 जानेवारी 2024 अखेर ज्या धान खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी केलेली आहे त्या खरेदी केंद्रावर जावून धान (भात) विक्री करावयाची आहे. शासनाकडुन खरेदी दिनांक 31 जानेवारी 2024 अखेर पूर्ण करण्याची सुचना आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा