You are currently viewing डॉ. शिवासर उज्जैनकर वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव व कवी संमेलन थाटात संपन्न..!

डॉ. शिवासर उज्जैनकर वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव व कवी संमेलन थाटात संपन्न..!

अमरावती :

 

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा 54 वा वाढदिवस नुकताच संत सावता माळी मंगल भवन मुक्ताईनगर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला याप्रसंगी तालुकास्तरीय इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ.सतीश तराळ, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आदिशक्ती संत मुक्ताई, सरस्वती व सावित्री मातेचे पूजन करण्यात आले प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याविषयी कौतुक केले व सर्वांनीच उज्जैनकर सर तसेच चि. सचिन उज्जैनकर यांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्यात प्रसंगी डॉ. जगदीश पाटील डॉ. प्रवीण पाचपांडे योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोदभाऊ सोनवणे तसेच फाउंडेशनच्या विविध जिल्ह्यातील सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी तसेच समाज बांधव व मित्र परिवारांनी उज्जैन कर यांचा सपत्नीक सौ. संगीता उज्जैनकर यांचा गुलाब बुके , शाल, श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा केला याप्रसंगी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आपल्या मनोगतात त्यांचे कुटुंबीय ,आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे पदाधिकारी राज्य कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले महाराष्ट्र मध्ये उंच भरारी घेत असून यामध्ये आपला सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळाचे 55 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फाउंडेशनचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले उज्जैनकर हे एक उत्कृष्ट संघटक, आयोजक, नियोजक, आदर्श शिक्षक, उत्कृष्ट पत्रकार, चिकित्सक, अभ्यासू वृत्तीचे त्याचप्रमाणे मनमिळाव स्वभावाचे असल्याचे डॉ. सतिश तराळ म्हणाले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा रामायण व महाभारतातील उत्कृष्ट उदाहरणांचा दाखला देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. एस.डी. पाटील फाउंडेशनचे राज्य प्रसिद्ध प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज येडगावकर, धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी व एडवोकेट कुलकर्णी साहेब बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य दिनकरराव झनक बुलढाणा ,जिल्हा सदस्य बाळूभाऊ ईटणारे ,संतोषभाऊ उंबरकर, अशोकभाऊ अनासुने जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोतदार जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर रोकडे जळगाव जिल्हा सल्लागार एन. जी. शेजोळे जळगाव जिल्हा खजिनदार सौ. वैशाली दैवज्ञ यशवंत महाजन सदस्य सौ. यशोदा पांढरे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख निलेश सोनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे फाउंडेशनचे कार्यकारणी सचिव प्रमोद पिवटे, कार्यकारणी सदस्य निंबाजीभाऊ हीवरकर, सुधाकर पाटील, शिवशंकर गोरले सी. जे. पाटील मुक्ताईनगर तालुका संपर्कप्रमुख डॉ. सुनील ऊदे फाउंडेशनचे आजीव सभासद सुनील सोनार आदी उपस्थित होते जळगाव, बुलढाणा , छत्रपती संभाजीनगर ,धाराशिव, अकोला, अमरावती येथील फाउंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले.

भोजनानंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये फाउंडेशनचे राज्यसचिव अकोला येथील डॉ. अशोक शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार जळगाव जिल्हा सदस्य सौ. यशोदा पांढरे यांनी सुरेल सूत्रसंचालन केले याप्रसंगी कवी फाउंडेशनचे राज्य प्रसिध्दी प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज येडगावकर राज्य खजिनदार कवी रामदास कोरडे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम वाडे उपाध्यक्ष दिनकरराव झनक संदीप साठे, धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी फाउंडेशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष मधुकर पोतदार छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे सौ. शितल पाटील, आर. के. ढोले, जयवंत बोदडे , कडू महाराज आदी कवींनी या कवी संमेलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कविता सादर केल्या. शेवटी कवी संमेलनाचे अध्यक्ष व फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ. अशोक शिरसाठ यांनी आपली कविता सादर करून डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या प्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व सन्माननीय कवींचे गुला बुके देऊन सत्कार केला. प्रसंगी एका हाताने टाळी वाजवण्यासाठी विश्व रेकॉर्ड बनवणारे अकोला येथील अमोल अनासने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा