रास्त धान्य दुकानदार, रॉकेल धारक संघटना १ डिसेंबर रोजी करणार धरणे आंदोलन
१ जानेवारी पासून बंद पुकारणार: जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन..
सिंधुदुर्गनगरी
रास्त भाव धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत १ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे तर १ जानेवारी २०२४ पासून बंद पुकारला जाणार आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष
रुपेश पेडणेकर,उपाध्यक्ष कान्होबा देसाई,सचिव शैलेंद्र कुलकर्णी,जिल्हा प्रवक्ता अमित गावडे, किशोर नारकर, तात्या हाडये ,विकास गोखले,गणपत राणे, सतीश मोरजकर ,नितेश स्वरप,सुदर्शन फोपे,बाळू लुडबे,प्रदीप मांजरेकर, संजय मळीक,लक्षुमन पवार आदी उपस्थित होते.
रास्त धान्य दुकानदाराच्या अनेक मागण्या प्रलबीत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे विविध मागण्यामध्ये प्रमुख्याने आयुष्यमान भारत योजनेचे काम धान्य दुकानदार करणार नाहीत त्या कामाची सक्ती करू नये सध्या दिवाळी सुद्धा मोफत धान्य वाटप करण्यासाठी दुकानात इंटरनेट सुविधा पूर्णता मिळत नाही या योजनेचे काम करण्यास धान्य दुकानात इंटरनेट सुविधा सर्वरचे बंद होणे ही डोके दुखी बनली आहे ही डोके दुखी गेल्या महिन्यात दुकानदार व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुकानात अनुभवले आहे त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेच्या कामाला विरोध आहे
शासनाने धान्य वितरणासाठी किंवा भविष्यात काही योजना शासनामार्फ तदुकानदारांकडून शकतात त्यासाठी आवश्यक असणारी इंटरनेट सुविधा पुरविण्यात येत नाही ती पुरवली पाहिजे ऑगस्ट 2023 पासून ते ऑक्टोबर 2023 पर्यंतचे कमिशन अद्याप मिळाले नाही ते तत्काल मिळावे या सर्व मागण्या व प्रश्नाकडे लक्ष वेढण्यासाठो धरणे आंदोलन १ डिसेंबरला करण्यात येऊन मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी पासून बंद पुकारणार असा इशारा देण्यात आला आहे.
*संवाद मीडिया*
🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧
*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*
*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*
● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗
*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁♂️त्वरित एक्स्चेंज
💁♂️लोन सुविधा उपलब्ध
*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे
📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*
📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*