You are currently viewing मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतुक – अभिमन्यू लोंढे

मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतुक – अभिमन्यू लोंढे

मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतुक – अभिमन्यू लोंढे

तालुका पत्रकार संघ, आंबोली सैनिक स्कुल, नगर परिषद यांच्या माध्यमातून रंगभरण स्पर्धा संपन्न..

सावंतवाडी

मोबाईलमध्ये हरविणार्‍या मुलांना चित्रांच्या रंगात रंगविण्याचे उपक्रम राबवून सावंतवाडी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कुलने जो उपक्रम राबविला, त्या उपक्रमासाठी मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतूक आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केलेे.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आंबोली सैनिक स्कुल आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तब्बल दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन सैनिक बँकेचे सरव्यवस्थापक तथा आंबोली सैनिक स्कुलचे सचिव सुनिल राऊळ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे,सैनिक स्कूलचे संचालक जॉय डॉन्टस, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सचिव मयूर चराठकर, हेमंत मराठे, वैभव अंधारे, गिरीश डिचोलकर, वैशाली खानोलकर, रुपेश पाटील, दीपक गावकर, उमेश सावंत, शैलेश मयेकर, साबाजी परब, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे रामचंद्र कुडाळकर पतसंस्थेचे चेअरमन कविटकर, माझी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर राजेश मोंडकर, आंबोली सैनिक स्कूलचे प्राचार्य एन डी गावडे, दिव्या वायंगणकर,आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. लोंढे म्हणाले, आत्ताच्या युगात मुले मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला अशा सर्व गोष्टी विसरली आहेत. स्पर्धेच्या युगात फक्त मोबाईल मध्ये ती हरविण्याची भिती आहे, अशा परिस्थिती सुध्दा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पालकांनी पुढाकार घेवून घेतलेला सहभाग हा कौतूकास्पद आहे.
यावेळी सुनिल राऊळ यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आंबोली सैनिक स्कुलच्या माध्यमातून आम्ही मुलांना सैनिक बनविण्याचे ट्रेनिंग देण्यासोबत घडविण्याचे काम करीत आहोत. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचे कलाकार घडणार आहेत. त्याचा फायदा मुलांना भविष्यात होणार आहे.
यावेळी सागर साळुंखे म्हणाले, या ठिकाणी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कुलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आपण कायम देवू. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, पत्रकार म्हणून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार कायम करीत असतो. परंतू त्या पलीकडे जावून अशा प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक काम करण्याचे काम सुध्दा पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे, हे कौतूकास्पद आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र पवार, सुत्रसंचालन विनायक गावस तर आभार विजय राऊत यांनी मानले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + seven =