You are currently viewing प्रधिकरणात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी शाम रंगतदार

प्रधिकरणात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी शाम रंगतदार

निगडी प्राधिकरण – (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

दि १८ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृहात दिवाळी विसावा अर्थात सूरमयी श्याम हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला.पिंपरी विधानसभा शिवसेना संघटिका सौ सरिता साने यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

प्यार का मौसम अशी थीम घेऊन डॉ सौ भाग्यश्री कश्यप आणि त्यांच्या टीम ने अफलातून कार्यक्रम सादर केला.९० च्या दशकातील अवीट गोडीची गाणी सादर केली वादा रहा सनम,सून महिया,होश वालो को खबर क्या..,मन क्यू मेहेका,जाने जिगर जानेमन,साथीयां ये तुने क्या किया,तुने ओ रंगीले कैसा जादू किया अशी अनेक गाणी उत्तम प्रकारे सादर झाली.वैजू चांडवडे,रश्मी बडे आणि भूषण कुमार या अत्यन्त ताकती च्या गायकांनी रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवलं.रशीद भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अप्रतिम अशी वादना ची साथ दिली. डॉ.सौ.भाग्यश्री कश्यप यांनी अतिशय खुमासदार निवेदन करून रसिकांची मने जिंकली.

सुप्रसिद्ध अभिनेत्री राधा सागर ही या कार्यक्रमा चे विशेष आकर्षण ठरली.आई कुठे काय करते,सुंदरा मनामध्ये भरली अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली राधा सागर हिने प्रेक्षकांशी संवाद साधला।चांद्रमुखी या चित्रपटात ही तिने उत्तम अभिनय केला आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.रसिकांनी या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बन्सल यांच्या प्रदीप स्वीट्स या प्रसिद्ध स्वीट मार्ट ने रसिकांना नाश्ता दिला.

गेली सहा वर्षे सौ सरिता ताई दिवाळी विसावा चे नियोजन करीत आहेत.वेगवेगळ्या कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करणे आणि रसिकांना उत्तम कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश असतो.

सौ ज्योती कानेटकर आणि सौ कल्याणी देशमुख यांनी या कार्यक्रमा चे संयोजन केले.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 20 =