You are currently viewing कणकवली नगरपंचायतीची शहराच्या सुधारित विकास योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज सायंकाळी ४ वाजता

कणकवली नगरपंचायतीची शहराच्या सुधारित विकास योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज सायंकाळी ४ वाजता

कणकवली

कणकवली शहराची सुधारित विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरु आहे . सदर प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकसहभाग असणे आवश्यक आहे . जेणेकरून विकास योजनेमध्ये स्थानिक लोकांद्वारे सुचविण्यात आलेल्या आवश्यक सुविधा विचारात घेऊन विकास योजना तयार करता येणे शक्य होईल . सदर बाब विचारत घेऊन दिनांक ८ सप्टेंबर रोजी नगरवाचनालय हॉल , कणकवली येथे सायंकाळी ४ वाजता कणकवली शहरातील उद्योजक , वास्तुविशारद , सामाजिक कार्यकर्ते व इतर भागधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . तरी त्याअनुषंगाने आपण हजर रहावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकरी अवधूत तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा