You are currently viewing शिरोडा व रेडी पं.स मतदारसंघात शिवसेना सभासद नोंदणीस शुभारंभ…

शिरोडा व रेडी पं.स मतदारसंघात शिवसेना सभासद नोंदणीस शुभारंभ…

वेंगुर्ला
शिरोडा व रेडी पंचायत समिती मतदारसंघात निरीक्षक संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीस शुभारंभ झाला.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पंचायत समिती मतदारसंघात सभासद नोंदणी शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात युवानेते वेंगुर्ला निरीक्षक संदेश पारकर बोलत होते. यावेळी त्यांनी राणे भाजपच वर्चस्व मोडीत काढून राणेंसारखी अपप्रवृत्ती जिल्हा परिषद मधून बाहेर फेकली गेली पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे अशा पद्धतीने काम केले पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा. जेवढी सभासद नोंदणी प्रामाणिकपणे कराल तेवढी तुमची ताकद मतदारसंघात वाढेलेली दिसेल. तर जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मार्गदर्शन करते वेळी दिपक केसरकर यांनी या रेडी मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली आणि प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. परिणामी दिपक केसरकर यांनी या मतदार संघात प्रथम क्रमांकाच लीड मिळाले हेच मताधिक्य आपण टिकवून ठेवलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हा आपल्या शिवसेनेचा असेल त्यासाठी खासदार विनायक राऊत व आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवा आणि तशी संधी सभासद नोंदणीच्या निमित्ताने मिळाली आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपले शिवसैनिक बनवा असे आवाहन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, आबा कोंडसकर, बाळा दळवी, तालुका प्रमुख बाळू परब यांनी सुद्धा मार्गदर्शन करतेवेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी अवधूत मालणकर, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपविभाग प्रमुख सुनिल सातजी, महिला विभाग संघटक सौ रश्मी डिचोलकर, शाखाप्रमुख विनोद राणे, उपसरपंच नामदेव राणे, श्रीकांत राऊळ, सायली पोखरणकर, सुवर्णा साळगावकर, वंदना कांबळी, स्नेहा साळगावकर, नंदीनी मांजरेकर, जेष्ठ शिवसैनिक संतोष मांजरेकर आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − twelve =