बांदा :
बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचक, सभासद, व साहित्यप्रेमींसाठी दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ उद्योजक भाऊ वळंजू व शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवाळी अंक योजनेत आरोग्यविषयक शतायुषी दिर्घायू, भविष्यविषयक ग्रहांकित, भाग्यसंकेत, धनुर्धारी, आवाज, जत्रा, धमाल यासारखे विनोदी अंक, तसेच विविध साहित्याने नटलेले विविध दैनिकांचे विविध प्रकारचे दिवाळी अंक उपलब्ध होणार आहेत. तरी सर्व साहित्यप्रेमीनी वार्षिक वर्गणी शंभर रूपये भरून या योजनेचे सभासद व्हावे व शंभर रूपयात दर्जेदार दिवाळी अंकांचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, अमिता परब यांच्यासह वाचक उपस्थित होते.