You are currently viewing भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, भाजपला खिंडार !

भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, भाजपला खिंडार !

देवगड

देवगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. यात माजी पं. स. सदस्य काका जेठे, भाजप बुथ कमिटी उपाध्यक्ष, किंजवडे सोसायटी उपाध्यक्ष संदीप कदम, माजी युवा अध्यक्ष सदानंद उर्फ बंटी जेठे, नितीन जेठे, भाई कोकम, प्रकाश कोकम, कुणाल जेठे, कुलदीप जेठे, नितीन कोकम, प्रमोद कोकम, विशाल जेठे, महादेव जेठे, सूर्यकांत फाटक, दिनेश फाटक, राजेंद्र कदम, गोपाळ खानविलकर, नामदेव मुणगेकर, नितीन आंबेरकर, सखाराम ( बंडू) कदम, अभिषेक कदम, गुरुनाथ कदम, शामसुंदर कदम, सुधाकर कदम या राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना नेते अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आरे येथील जिजी मंगल कार्यालय येथे हा जाहीर प्रवेश झाला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख उमेश कदम, शाखा प्रमुख विलास मालंडकर, निनाद देशपांडे, शरद लोके, राजू तावडे, भास्कर राणे, आबा जेठे, आबा कोकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =