You are currently viewing वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग; हजारोंचे नुकसान

वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग; हजारोंचे नुकसान

वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग; हजारोंचे नुकसान

वेंगुर्ले

वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या इमारतीला आग लागून खत दुकानाचे हजारोंचे नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. वेळीच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत वेंगुर्ले पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे साडेचारच्या दरम्याने वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत विक्री इमारतीला अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणाऱ्या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबीयांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमीत नाईक, कुणाल नाईक. प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडुन पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे साडेपाच पर्यंत आग पूर्णतः विझवण्यात यश आले.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा