You are currently viewing कासरल गावातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

कासरल गावातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नितेश राणेंकडून स्वागत ; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश…

कणकवली

पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासरल गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम झाला.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्‍यांमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत यांचे पूत्र ॲड.प्रसाद सांत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत, कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्यासह गावातील प्रमुख ठाकरे सेना गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

ओम गणेश बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेशावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, माजी उपसभापती महेश गुरव, दिलीप तळेकर, जिल्हा बँक संचालक ॲड. समीर सावंत, भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा