You are currently viewing देवगडात पुणेरी पहाट कार्यक्रम उत्साहात संपन्न

देवगडात पुणेरी पहाट कार्यक्रम उत्साहात संपन्न

देवगड :

 

देवगड येथे नुकताच पुणेरी पहाट कार्यक्रम सादर करण्यात आला. नृत्य व भावगीत संगीत आणि भरलेल्या कार्यक्रम पहाण्यासाठी देवगडकर रसिकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी संकल्पना भाई बांदकर यांनी राबवली चारुदत्त सोमण व संजय धुरी या कामी मदत केली.

या कार्यक्रमास मान्यवर म्हणून माजी आम. ॲड. अजित गोगटे, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नगराध्यक्षा सौ. साक्षी प्रभू, समाजसेवक संदीप साटम, उद्योगपती प्रसाद पारकर, नगरसेवक श्री. दत्तप्रसाद रानडे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमातील कलाकार गायक – श्री.संदीप फडके, श्री.राकेश मिठबावकर, गायिका- सौ. प्रियांका वेलणकर, डाॅ. निशा धुरी, डाॅ. पुजा पाटील, नृत्य – कु. किर्ती पुजारे, कु. श्रुती सोमण, वादक – श्री.रमेश गोंधळी, श्री.गंधार कदम, श्री.नरेंद्र पाटील, स्पेशल इफेक्ट्स- नारद – कु.आकाश सपकाळ व सौ.प्रिती देवधर यांनी हा कार्यक्रम सादर केला

प्रतिक्रिया व्यक्त करा