You are currently viewing कोकण रेल्वे मार्गावर १७ नोव्हेंबर रोजी अडीच तासाचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर १७ नोव्हेंबर रोजी अडीच तासाचा मेगाब्लॉक

सिंधुदुर्ग :

कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर-सिंधुदुर्ग विभागादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी २ तास ३० मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ९.३० वाजता सुरू होणारा मेगा ब्लॉक सकाळी १२ वाजता संपुष्टात येईल. यामुळे ५ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

५०१०८ क्रमांकाच्या मडगाव-सावंतवाडी पॅसेंजरचा १७ नोव्हेंबर रोजी सुरूं होणारा प्रवास सकाळी ७.३० वाजता पूर्वनिर्धारित केला आहे. ही पॅसेंजर १ तास २० मिनिटे उशिराने धावेल. १०१०६ क्र.ची सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस २ तास ५ मिनिटे उशिराने धावेल.

१०१०४ सीएसएमटी मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस १७ नोव्हेंबर रोजी करमाळी – सावंतवाडी विभागादरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १२०५१ क्र.ची सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस १७ रोजी रत्नागिरी, राजापूर विभागादरम्यान २० मिनिटांसाठी रोखण्यात येईल. २२११९ क्र.च्या सीएसएमटी मुंबई- मडगाव तेजस एक्सप्रेसचा प्रवास १७ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी ते राजापूर विभागादरम्यान नियमित केला जाणार आहे.

कुमठा-मडगावदरम्यानही १६ रोजी मेगाब्लॉक कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा-मडगाव विभागादरम्यानही १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ ते दुपारी ३ या वेळेत मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे. ०६६०२ क्र.ची मंगळूर सेंट्रल-मडगाव स्पेशल १६ नोव्हेंबर रोजी कुमठा- मडगाव विभागादरम्यान धावणार नाही. ०६६०१ क्र.च्या मडगाव- मंगळूर सेंट्रलचा प्रवासही रोजी अंशतः रद्द करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =