You are currently viewing विजेच्या तक्रारींनी ग्राहक हैराण, चांगली सेवा द्या…

विजेच्या तक्रारींनी ग्राहक हैराण, चांगली सेवा द्या…

विजेच्या तक्रारींनी ग्राहक हैराण, चांगली सेवा द्या…

सावंतवाडी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा…

सावंतवाडी

वीज वितरणच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. परिणामी चांगली सेवा देण्यासाठी त्या तक्रारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक असल्यास आमची मदत घ्या, परंतु लोकांना चांगली सेवा द्या, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता तनपुरे यांच्याकडे केली. दरम्यान यावेळी सावंतवाडी व दोडामार्गातील ग्रामीण भागात अनेक समस्यांवर चर्चा केली. तसेच त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशा सूचना केल्या. या चर्चेदरम्यान अनेक सरपंचांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, अजय सावंत, सुधीर दळवी, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा