You are currently viewing ११ नोव्हेंबरला कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने नरकासुर स्पर्धा

११ नोव्हेंबरला कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने नरकासुर स्पर्धा

कणकवली :

 

शिवसेना तालुका कणकवली आणि कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार ११ नोव्हेंबर ला रात्री ०७:३० वाजता कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक, १००००/- रुपये, द्वितीय पारितोषिक : ७०००/-, तृतीय पारितोषिक, ५०००/- आणि उत्तेजनार्थ बक्षिस दिले जाणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर आणि कणकवली शहर प्रमुख सत्यजित (बाळू) पारकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा