You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार…

मालवण

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार पाच नोव्हेंबरला मतदान होत असल्याने या दिवशी होणारा आठवडा बाजार शनिवारी घेण्याचा निर्णय आचरा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे .

मतदान निर्धोक आणि शांततेत व्हावे या साठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी त्या दिवशीच्या आठवडा बाजाराबाबत निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले होते. या दृष्टीने आचरा व्यापारी संघटना पदाधिकारयांनी बुधवारी दुपारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, व्यापारी संघटनेचे वामन आचरेकर, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, मंदार सांबारी, देवेंद्र नलावडे, पोलीस कर्मचारी पडवळ जगताप आदी उपस्थित होते. या बैठकीत रविवारचा आठवडा बाजार शनिवारी भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा