You are currently viewing मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी वेंगुर्ला तहसीलदार यांना निवेदन

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी वेंगुर्ला तहसीलदार यांना निवेदन

*मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी वेंगुर्ला तहसीलदार यांना निवेदन*

वेंगुर्ला

कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे अशी मागणी आज वेंगुर्ले तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले . याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार श्री ओंकार ओतारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले की , आम्ही सकल मराठा समाज बांधव सुरुवातीपासूनच या ‘मराठा आरक्षण’ मागणी संदर्भात सक्रियपणे काम केलेले आहे. अनेक मोर्चात सहभागी होत आम्ही शांततेत अनेकदा ती मागणी केली आहे.
या सरकारने अनेक बैठकातून या विषयी सकारात्मकता दर्शवलेली आहे आणी भुमीका स्पष्ट केली आहे.आम्ही सर्व परिस्थितीत खंबीर पणे सरकारच्या पाठीशी आहोत. आम्हा मराठा समाजाची पुर्ण खात्री आहे की हे सरकार आमच्या मागणीनुसार कायद्याच्या कसोटीवर कोर्टात टीकणारे आणि कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे ,कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावणारे असे शाश्वत आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करित आहे. मुख्यमंत्री यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव ही मराठा समाजाला करून दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ही प्रामाणिक पणे अभ्यासपूर्ण काम सुरू आहे त्याला अधिक गती मिळून आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठीच आमची ही मागणी सरकार दरबारी सादर व्हावी.
आमचा सर्व सकल मराठा समाज या सरकारच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आहे आणी आमची आरक्षणाच्या विषयाला गती देण्याची मागणी आपण सरकार पर्यंत पोहोचवावी ही विनंती . अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले .
यावेळी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , नागेश उर्फ पिंटू गावडे , सत्यवान परब , सौ.आकांक्षा आनंद परब , सौ.उत्कर्षा उदय परब , विनायक सदानंद गवंडळकर , शैलेश जामदार , गोविंद भिवा नाईक , राजेश जामदार , विक्रम विजय सावंत , चंद्रकांत विष्णू सावंत , सौ.सुषमा गावडे खानोलकर , सौ.स्वरा चेतन देसाई , रविंद्र गणपत परब , समीर दिनेश नाईक , हेमंत दत्ताराम गावडे , मारुती दोडशानट्टी , नामदेव सरमळकर , रामचंद्र महादेव परब , सौ.रक्ष्मी रामचंद्र परब , सिद्धेश रमेश राऊळ , विष्णू चंद्रकांत परब , सुनील हरी परब , प्रविण मनोहर सावंत , कृष्णाजी बाबाजी सावंत , नारायण नागेश कोचरेकर , शिवदत्त आत्माराम सावंत , सुधीर कृष्णा गावडे , रामकृष्ण अर्जुन सावंत , सत्यविजय रा.गावडे , राकेश गावडे , निलेश रमाकांत गवस , प्राजक्ता बाबुराव देसाई , सौ.सुजाता संदीप देसाई , गुरुनाथ रामचंद्र घाडी , संदीप लवु देसाई , नारायण आत्माराम घाडी , आनंद जयवंत गावडे , प्रणव बाबली वायंगणकर , सुरज सहदेव सावंत , उदय अनंत गावडे , अमेय बाळा धुरी इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा