You are currently viewing आयुष्मान कार्ड नोंदणीकरिता लाभार्थ्यांना आवाहन…

आयुष्मान कार्ड नोंदणीकरिता लाभार्थ्यांना आवाहन…

आयुष्मान कार्ड नोंदणीकरिता लाभार्थ्यांना आवाहन…

सावंतवाडी

आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा असुन ही योजन विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असेल आवश्यक आहे. या योजनेचा पुढच्या टप्प्यात सावंतवाडी शहरातील लाभार्थ्यांकडून शासनामार्फत निवड करणार आली आहे.
आयुष्यमान कार्ड नोंदणीकरिता लाभार्थ्यांनी आपल्या जवळील उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी व संजीवनी बालरूग्णालय, सालईवाडा तसेच मान्यताप्राप्त आपले सरकार केंद्र, या ठिकाणी जाऊन ई-के. वाय. सी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपले रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. आज वि. स. खांडेकर महाविद्यालय, गुरुवार २८ डिसेंबरला प्रभाग १ बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी डॉ. अजय स्वार दवाखाना समोर, २९ डिसेंबरला प्रभाग क्रमांक दोन बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी डॉ. अजय स्वार दवाखाना समोर, १ जानेवारीला प्रभाग क्रमांक ३ सी. एल. सी सेंटर वैश्यवाडा सावंतवाडी येथे संपर्क साधावा.
मंगळवार २ जानेवारीला प्रभाग क्रमांक ३ सी. एल. सी सेंटर वैश्यवाला सावंतवाडी, बुधवार ३ जानेवारीला प्रभाग क्रमांक ४ ॲन्टोनी मोतेस डिकुन्हा झिरंग प्राथमिक शाळा क्रमांक ७, गुरुवार ४ जानेवारीला प्रभाग क्रमांक ५ नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी, शुक्रवारी ५ जानेवारीला प्रभाग क्रमांक ६ नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी, सोमवार ८ जानेवारीला शिल्पकार सेंटर लगतचा कक्ष, मंगळवार ९ जानेवारीला प्रभाग क्रमांक ७ आपला दवाखाना मिलाग्रीस जुने चर्च समोर, बुधवार १० जानेवारीला प्रभाग क्रमांक ७ आपल्या दवाखाना मिलाग्रीस जुने चर्च समोर, गुरुवारी ११ जानेवारीला प्रभाग क्रमांक ८ ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र सालईवाडा, शुक्रवारी १२ जानेवारीला प्रभाग क्रमांक ९ समाज मंदिर कडील बहुउद्देशीय केंद्र सावंतवाडी येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा