You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हर हर महादेव घोषणांनी अवघी मालवणनगरी दुमदुमली

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हर हर महादेव घोषणांनी अवघी मालवणनगरी दुमदुमली

३२ गडकिल्ल्यांतील पवित्र माती अर्पण पायाभरणी सोहळा प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, पर्यटन महासंघ, मेढा-राजकोट नागरिक तसेच असंख्य शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत संपन्न..

 

मालवण :

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हर हर महादेव घोषणांनी मालवण नगरी आसमंत बुधवारी दुमदुमुन गेला. ढोलताशांचा गरज, पारंपरिक वेशभुषा आणि छत्रपतीं शिवाजी महाराज, अष्टप्रधान मंडळ तसेच ऐतिहासिक वेशभुषा परिधान केलेली मंडळी अशा शिवमय वातावरण मालवण शहरात बुधवारी ३२ गडकिल्ल्यांतील माती कलश मिरवणूक पुष्पवृष्टी मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या अलोट गर्दीत पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातून निघाली. सागरी महामार्ग, बाजारपेठ मार्गे मेढा राजकोट किल्ला याठिकाणी ही मिरवणूक उत्स्फूर्त वातावरण संपन्न झाली. रायगड आणि शिवनेरी किल्ला येथूनही मातीकलश याठिकाणी आणण्यात आले होते. मेढा राजकोट याठिकाणी भगवे फेटे परिधान केलेले शिवप्रेमी नागरिक आणि नऊवारी साड्यांतील महिलां व विविध ऐतिहासिक वेशभूषा मधील मुले मोठ्या संख्येने सहभागी होते. हा संपूर्ण कार्यक्रम आनंद सोहळा ठरला.

जिल्हा प्रशासन वतीने किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीच्या पायाभरणीत ३२ गडकिल्ले येथील संकलित माती मालवण शहरातून मिरवणुकीने मेढा राजकोट येथे आणण्यात आली. प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, पर्यटन महासंघ, मेढा-राजकोट नागरिक तसेच असंख्य शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत गडकिल्ले माती संकलन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तसेच माजी खासदार निलेश राणे, भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत, पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्यासह असंख्य शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत गडकिल्ले माती अर्पण पायाभरणी सोहळा संपन्न झाला. मेढा मौनीनाथ मंदिर येथेही दर्शन घेत पूजन करण्यात आले.

 

कलश मिरवणुकीमध्ये आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, राजू राऊळ, भाऊ सामंत, बंड्या सावंत, पर्यटन महासंघाचे बाबा परब, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, माजी सभापती अजिंक्य पाताडे, पूजा करलकर, पूजा सरकारे, ज्योती तोरसकर, विकी तोरसकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, चारुशीला आचरेकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, प्रमोद करलकर, शुभम लुडबे, पंकज पेडणेकर, ललित चव्हाण, सुमित सावंत, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, सहदेव बापर्डेकर, जॉन नन्होना, बबन रेडकर, अवि सामंत, मंगेश जावकर, दादा वेंगुर्लेकर, मिलिंद झाड, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, सरदार ताजर, सचिन आंबेरकर, परशुराम पाटकर, गुरुनाथ राणे, सतीश आचरेकर, दिलीप वायंगणकर, सुर्यकांत फणसेकर, रत्नाकर कोळंबकर, नंदू देसाई, कैलास खांदारे, राजू गोडसे, हेमंत रामाडे, नागेश परब, योगेश कांबळे, अथर्व काळसेकर, नितीन केरकर, प्रवीण काळसेकर, नवनीत लब्दे, केतन जोशी, कमलेश चव्हाण, कॅलिस फर्नाडिस, विजय चव्हाण, राजा मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी राजकोट किल्ल्याप्रमाणे इतरही गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे, तसेच राजकोट शिवपुतळा याठिकाणी जिल्ह्यातील सर्व गडकोट किल्ल्यांची माहिती असलेले एक दालन उभारण्यात यावे अशी मागणी केली. विजय केनवडेकर यांनी मालवण शहरात रंगरंगोटी करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली. तसेच राजकोट किल्ला परिसरात लाईट अॅण्ड साऊंड शो, कलादालन यासाठी पालकमंत्री यांनी निधी वितरित करणेबाबत प्रशासनास कार्यवाही बाबत सूचित केले असे सांगीतले. आभार मानताना गणेश कुशे यांनी राजकोट व मेढा परिसरातील पर्यटन विकासासाठी नविन दालन उघडले असून यासाठी पालकमंत्री यांचे आभार असून अन्याआवश्यक पायाभुत सुविधांसाठी अधिकाधिक निधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील जलदुर्गावर पिएचडी करणाऱ्या टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षीका सौ. ज्योती तोसरकर यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीसाठी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पायभरणी समारंभात मालवण देऊळवाडा येथील अभ्यंकर भटजी यांना सन्मान मिळाला होता. आता त्यांच्या नवव्या पिढीतील विलास अभ्यंकर यांना शिवपुतळा उभारणीच्या ठिकाणी पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला.भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष मालवणकडे असेल.

नौदल दिन आजपर्यंत इतर ठिकाणी केला जात होता. मात्र यावर्षीचा नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्ग परिसरात तसेच किल्ले राजकोट याठिकाणी केला जात आहे. छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान याठिकाणी येत असल्याने संपूर्ण जागाचे लक्ष मालवणकडे लागलेले असेल . छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक ठेवा ही आपली अस्मिता आहे. 4 डिसेंबला होणारा सोहळा भव्य दिव्य होईल याकडे प्रत्येक शिवप्रेमींना लक्ष दिला पाहिजे हा सोहळा प्रत्येक मालवणवासियांचा तसेच तमाम शिवप्रेमी यांचा आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेकांचे लक्ष लागले आहेत, असेही पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून माझी निवड अपघाताने झाल्यानंतर याठिकाणी जे जे शक्य आहे ते ते पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. पर्यटन विकास आणि सिंधुदुर्गाच्या सर्वागिण विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासोबत मंत्रीमंडळातील सर्व सहकारी सहकार्य करत आहेत. ४ डिसेंबरचा सोहळा आणि नौदल दिन सोहळा हा न भुतो न भविष्यात असा करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. नारिकांनीही आपला वाटा उचललेला दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणमध्ये येत असल्याने मालवणचा विकासात्मक कायापालट दिसून येईल, असेही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या राजकोट किल्ल्याची पुर्नबांधणी केल्याबद्दल राजकोट आणि मेढा वासियांच्यावतीने त्यांचा भव्य पुष्पहार आणि बांबूपासून बनविलेली शिवप्रतीमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पर्यटन महासंघाच्यावतीने मानपत्र देऊनही पालकमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा