You are currently viewing यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या मयुरी गावडेला “केंद्र शासनाची विज्ञान शिष्यवृत्ती” जाहीर

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या मयुरी गावडेला “केंद्र शासनाची विज्ञान शिष्यवृत्ती” जाहीर

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमधील बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मयुरी गावडेला केंद्र शासनाची विज्ञान शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

तिने सादर केलेल्या भटक्या जनावरांसाठीच्या हर्बल स्प्रे संशोधन प्रकल्पाला प्रति महिना दहा हजार याप्रमाणे पुढील तीन महिने शिष्यवृत्ती मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयातर्फे ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. या कार्यालयामार्फत 2020 मध्ये पुणे नॉलेज क्लस्टर या विभागीय कार्यालयाची स्थापना करण्यात आली. नाविन्यता व संशोधन विकासाला चालना देणे हे या विभागाचे कार्य असून पर्यावरण, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील नवकल्पनांना बळ देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

पुणे नॉलेज क्लस्टरने फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पांची छाननी करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये निवडण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पात मयुरी गावडेचा समावेश आहे. भटक्या जनावरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीचा हर्बल स्प्रे या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी तिला कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप व एम.फार्मसीचे फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ.गौरव नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. मयुरी गावडेच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व संचालक मंडळाने तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =