You are currently viewing चंद्र सांगतो

चंद्र सांगतो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम कविता*

 

*चंद्र सांगतो…*

 

कलेकलेने चंद्र वाढतो पूर्णत्वाला जातो

कलेकलेने झिजणे त्याचे, काही सांगून जातो

भरती ओहोटी जीवनात हो येणारच येणार

सृष्टी क्रम हा कुणा न चुकला सांगा कसा चुकणार …

 

साम्राज्ये ती आली गेली सिकंदर ही गेला

आर्य चाणक्य नि मौर्य ही नामशेष झाला

काळाचे हो गणित मोठे इथे सान ना थोर

मुठीत असतो जीव पहाना कुणी नाही बिनघोर …

 

नाव ठेवूनी गेले सारे इतिहासी सामावले

हिशोब कसला करता आता केले, कमावले

काळाचा हा वरवंटा हो सारे सपाट करतो

युधिष्ठिर वा नल असू द्या साम्राज्ये तो हरतो…

 

चंद्र किती तो सुंदर दिसतो रोज रोज झिजतो

मी ही आहे जणू बाहुले आम्हाला समजावतो

“पुन्हा परंतु मूळ रूपाला मी ही येऊ शकतो”

धीर सोडू नये जणू तो आम्हाला शिकवितो …

 

किती येऊ दे, संकटे जीवनी, स्थितप्रज्ञ असावे

घालमेल ती उगा जीवाची,अस्वस्थ कशाला व्हावे?

जे जे येईल पहा सामोरी सहजी झेलत जावे

“काटे विसरून जीवनात या गुलाब पेरीत यावे “….

 

चंद्र सांगतो मी ही झिजतो तरी ही सुंदर दिसतो

सुक्ष्म रूपाने मनात तुमच्या मी तर नित्यच वसतो

उष्ण शीतल वाऱ्याची सय ती असणारच जीवनी

चंद्र सांगतो कधीच दु:खी होऊ नये हो कुणी …

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 3 =