You are currently viewing डिचोलीत मॉर्निंग वॉक करताना पोलीस उपनिरीक्ष प्रदीप कुबल यांचा मृत्यू

डिचोलीत मॉर्निंग वॉक करताना पोलीस उपनिरीक्ष प्रदीप कुबल यांचा मृत्यू

डिचोलीत मॉर्निंग वॉक करताना पोलीस उपनिरीक्ष प्रदीप कुबल यांचा मृत्यू

दोडामार्ग

एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुबल यांचे आज सकाळी मॉर्निंग वॉक करताना निधन झाले. येत्या काही महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच डिचोली येथे आ सकाळी मॉर्निंग वॉक करताना त्यांची प्राणज्योत मालवली. मॉर्निंग वॉक करताना ते अचानक खाली कोसळले त्यानंतर काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कुबल हे मूळचे दोडामार्ग येथील होते. ते कुटुंबासह मुळगाव ( डिचोली) येथे राहत होते. त्यांनी गेल्या ७ वर्षांपासून एटीएसमध्ये वेगवेगळ्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. सहा महिन्यांनंतर ते सेवेतून निवृत्त होणार होते. पण तत्पूर्वीच काळाने त्यांना हेरले. त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी झाली होती. एका वर्षापूर्वी त्यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. ते उत्तम भजनी कलाकार म्हणूनही परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या व मुलगा असा परिवार आहे.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eight =