You are currently viewing ३० ऑक्टोबर रोजी मालवणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पदवीधर निवडणूक आढावा बैठक
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

३० ऑक्टोबर रोजी मालवणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पदवीधर निवडणूक आढावा बैठक

मालवण :

 

उद्या सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी कोकण पदवीधर मतदार संघाच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दुपारी १२ वा. हॉटेल हेरिटेज येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना विस्तारक गितेश राऊत, युवतीसेना जिल्हा विस्तारक कु. रुची राऊत, युवासेना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कोकण पदवीधर निवडणुक प्रमुख किशोर जैन आढावा घेणार आहेत. तरी मालवण तालुक्यातील सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी, शिवसेना उपतालुका प्रमुख-विभागप्रमुख-उपविभाग-सर्व समन्वयक, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख-विभागप्रमुख-उपविभाग-सर्व समन्वयक, तालुक्यातील प्रमुख युवासेना पदाधिकारी, युवासेना उपतालुका अधिकारी-विभाग अधिकारी-उपविभाग अधिकारी, युवतीसेना पदाधिकारी, युवतीसेना उपतालुका अधिकारी-विभाग अधिकारी-उपविभाग अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तालुका अधिकारी मंदार गावडे, शिवसेना महिला तालुका संघटक सौ.श्वेता सावंत, शिवसेना महिला तालुका संघटक सौ. दीपा शिंदे, युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा खोत, शिवसेना महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पुनम चव्हाण, युवतीसेना तालुका अधिकारी सौ.निनाक्षी मेतर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =