You are currently viewing पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना कर्मयोद्धा पुरस्कार…

पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना कर्मयोद्धा पुरस्कार…

दोडामार्ग
गोव्यातील पेडणे पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी गेल्या काही महिन्यांपासून कडक भूमिका घेत ३४ लाख या मुद्देमालचा चरस जप्त केला होता तसेच १करोडचे ड्रग पकडण्यात त्यांची यशस्वी भूमिका होती.त्यामुळे त्यांची पोलीस प्रशासनवर वेगळी छाप होत गेली.त्यांच्या या उत्तम कामगिरीमूळे अँटी करप्शन ऑफ इंडिया यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी धडाकेबाज कामगिरीने चर्चेत असणारे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या कार्याची दखल घेत अँटी करप्शनने कर्मयोध्या या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
यावेळी इंटरनॅशनल डायरेक्टर शोभा कोकीतकर ,गोवा राज्या अँटी करप्शनचे अध्यक्ष सतीश नाईक,उपाध्यक्ष नैनेश गावडे,चेअरमन पांडुरंग खवनेकर,मुख्य संचालक यशवंत धाउसकर,मुख्य प्रभारी सुनील मेवाडा ,विराज नाईक,चंदगड तालुकाध्यक्ष संजय गावडे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा