You are currently viewing १४ दिवस कॉरंटाईन सक्तीच…

१४ दिवस कॉरंटाईन सक्तीच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी व अन्य लोकांकरिता कॉरंटाईनचे शिक्के मोर्तब

नियम मोडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करा –  पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग: 

जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके, रेल्वे स्टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. जर त्या लोकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटल अन्य ठिकाणी हलवण्याबाबत येईल, याबद्दल ताबडतोब मी जिल्हा शल्य चिकित्सक याच्याशी बोलतो,असे आश्वासनही त्यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा पालक मंत्री यांनी ऑनलाईन पत्रकारांशी संवाद साधला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. तरीदेखील कोल्हापूर व रायगड या ठिकाणाहून अधिकचा ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. दररोज ऑक्सिजनचे मोठे ६० बाटले आमच्या ऑक्सीजन प्लांट वर उपलब्ध होत आहेत.

त्याच बरोबर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड देखील उपलब्ध आहेत. तरी देखील कोविड केअर सेंटर असलेल्या काही ठिकाणी ऑक्सिजन बेड तयार करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्र सरकारने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सोयीचे होईल असे नियम आणि नियोजन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी करावेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ग्राम कृती दल आहे, त्यांना विमा संरक्षण देण्याबाबत आमचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे.

केंद्र सरकारने अचानकपणे या विमा संरक्षण कवच काढून घेतले आहे. तरी देखील चांगल्या पद्धतीने या कालावधीत काम ग्राम कृती दल करेल असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − five =