You are currently viewing शेतकरी आंदोलनाला सावंतवाडी काँग्रेसचा पाठिंबा

शेतकरी आंदोलनाला सावंतवाडी काँग्रेसचा पाठिंबा

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठींबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात काँग्रेसने आंदोलन केले त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे शासन प्रशासनाचे पालन करून सामाजिक अंतर राखून शाततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा व्यक्त करून घोषणा बाजी करण्यात आली.
या वेळी जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, तालुका सरचिटणीस अन्वर खान,  शहर अध्यक्ष ॲड.राघवेंद्र नार्वेकर, युवक शहराध्यक्ष साद शेख, रुपेश आईर, विल्यम सालढाणा, राज पेडणेकर, माया डुबळे, संतोष मडगावकर, कौस्तुभ सामंत, जासमीन मुल्ला, संगीता सावंत, ॲड.विराज मसुरकर, मंजुषा डांगी, अमित डिसोझा आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 13 =