You are currently viewing अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास  शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा नांदगावासीयांसह ठाकरे गटाचा इशारा

अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास  शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा नांदगावासीयांसह ठाकरे गटाचा इशारा

अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास  शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा नांदगावासीयांसह ठाकरे गटाचा इशारा

कणकवली

तालुक्‍यातील नांदगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू आहे. येत्‍या आठ दिवसांत या दारू व्यवसायावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने या दारू विक्रेत्‍यांना धडा शिकवू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
येथील पोलीस ठाण्यात आज नांदगावमधील काही ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक आदींनी चर्चा केली.
नांदगाव परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्‍यामुळे युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्‍या विरोधात पोलीस प्रशासन काय करत आहे असा सवाल संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह नांदगाव वासीयांनी केला. तर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आत्तापर्यंत जेथे अवैध दारू धंदे सुरू असल्‍याची माहिती मिळाली, त्‍या सर्व ठिकाणी कारवाई केल्याची माहिती दिली. तर इतर ठिकाणी जशी पोलिसांकडून कारवाई केली जाते तशी नांदगाव परिसरात होत नसल्‍याचा आरोप नांदगाव वासीयांनी केला. यावर पोलीस निरीक्षक श्री.यादव यांनी अवैध दारू विक्री होत असल्‍याच्या परिसराचे लोकेशन शेअर करा तातडीने कारवाई करतो असा इशारा दिला.
नांदगाव मधील अवैध दारू विक्रेत्‍यांना पाठीशी घातले जाते. त्‍यामुळे कारवाई झाली तरी अवैध दारू व्यवसाय सुरू राहतो. त्‍यामुळे पुन्हा दारू विक्री करण्याची कुणाची हिम्मत होता नये अशी कारवाई करा अशी मागणी संदेश पारकर यांनी केली.
अवैध दारू विक्री प्रश्‍नी कणकवली पोलीस निरीक्षकांसोबत जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, दिव्या साळगावकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, राजू राठोड, तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, भाई साटम, निसार शेख, राजा म्हसकर, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, तात्या निकम, संजय पारकर, सचिन सावंत आदींन चर्चा केली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा